प्रधानमंत्री आवास योजना अभियानात कल्याण तालुका तर राज्य पुरस्कृत योजनांमध्ये अंबरनाथ तालुका प्रथम

आठवडा विशेष टीम―

ठाणे, दि. १५ (आठवडा विशेष) : केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे अंतर्गत ठाणे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या प्रधानमंत्री महा आवास ग्रामीण अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना आज राज्याचे सार्वजनिक बांधकाम व अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये कल्याण तालुक्याला तर राज्य पुरस्कृत योजनांमध्ये अंबरनाथ तालुक्याला जिल्हास्तरीय सर्वोकृष्ट तालुक्याचा पहिला पुरस्कार देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमास जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे महापालिकेचे आयुक्त बिपीन शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते,  जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, विषय समिति सभापती श्रेया गायकर , वंदना भांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सर्वांसाठी घरे 2022 हे केंद्र शासनाचे महत्वाचे धोरण असून त्या अनुषंगाने राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्वीकार केलेला आहे. त्याकरिता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात  दिनांक 20 नोव्हेंबर 2021 ते दिनांक 30 जून 2022 या कालावधीत महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले होते. या अभियान   कालावधीमध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमांचे मूल्यमापन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना महा आवास अभियान पुरस्कार देऊन आज गौरविण्यात आले.

 प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट तालुके

प्रथम क्रमांक -कल्याण, द्वितीय क्रमांक -अंबरनाथ, तृतीय क्रमांक -मुरबाड.

 सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार पुढील प्रमाणे –

प्रथम क्रमांक -झाडघर, तालुका मुरबाड, द्वितीय क्रमांक – साकडबाव, तालुका शहापूर, तृतीय क्रमांक -एकसाल, तालुका भिवंडी.

 सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार – प्रथम क्रमांक -ग्रामपंचायत उचले, तालुका मुरबाड, द्वितीय क्रमांक -ग्रामपंचायत वांगणी , तालुका अंबरनाथ, तृतीय क्रमांक -ग्रामपंचायत खर्डी, तालुका शहापूर.

 राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ट तालुके- प्रथम क्रमांक -अंबरनाथ, द्वितीय क्रमांक -कल्याण,तृतीय क्रमांक- शहापूर

 सर्वोत्कृष्ट क्लस्टर – प्रथम क्रमांक -कोळोशी, तालुका मुरबाड, द्वितीय क्रमांक -आवाळे, तालुका शहापूर, तृतीय क्रमांक -दाभाड, तालुका भिवंडी.

 सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत – प्रथम क्रमांक- ग्रामपंचायत वैशाखरे, तालुका मुरबाड, द्वितीय क्रमांक -ग्रामपंचायत चामटोली, तालुका अंबरनाथ, तृतीय क्रमांक- ग्रामपंचायत कोशिंबे, तालुका भिवंडी.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.