प्रशासकीयब्रेकिंग न्युज

विधानपरिषद कामकाज

आठवडा विशेष टीम―

विधानपरिषदेत नवनियुक्त मंत्री यांचा परिचय

मुंबई, दि. 17 : विधानपरिषदेत नवनियुक्त मंत्री यांचा परिचय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला यावेळी करून दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वने, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, कामगार मंत्री सुरेश खाडे, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण मंत्री प्रा.तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शालेय शिक्षण व  मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा परिचय सभागृहाला यावेळी करून देण्यात आला.

००००

विधानपरिषदेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

मुंबई, दि. 17 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे विधानपरिषद सभागृहात वाचन करण्यात आले. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यानंतर सभागृहात राष्ट्रगीत म्हणण्यात आले.

००००

विधानपरिषद तालिका सभापतींची नियुक्ती

मुंबई, दि. 17 : पावसाळी अधिवेशनासाठी  उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री प्रसाद लाड, नरेंद्र दराडे, बाबाजानी दुर्राणी, सुधीर तांबे यांची नियुक्ती केली.

000000

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेत परिचय

मुंबई, दि. 17 : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषद सभागृहात परिचय करून देण्यात आला. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते श्री. दानवे यांचा सभागृहाला परिचय करून दिला.

०००

विधानपरिषद नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय

मुंबई, दि. 17 : नवनिर्वाचित विधान परिषद सदस्यांचा परिचय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. यामध्ये सर्वश्री रामराजे नाईक -निंबाळकर, एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, प्रा. राम शिंदे, अशोक उर्फ भाई जगताप, प्रसाद लाड, आमश्या पाडवी, श्रीकांत भारतीय, श्रीमती उमा खापरे या सदस्यांची सभागृहाला ओळख करून दिली.

00000

विधानपरिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 17 : विधानपरिषदेत  दिवंगत सदस्यांना शोकप्रस्तावाद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी राज्यपाल काटीकल शंकरनारायणन, माजी वि.प.स. व माजी राज्यमंत्री हरिभाऊ जागोबाजी नाईक, माजी वि.प.स. विनायक तुकाराम मेटे यांच्या निधनाबद्दल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शोक प्रस्ताव मांडला व मनोगत व्यक्त केले व दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.  हा शोकप्रस्ताव सर्वसंमतीने संमत करण्यात आला.

००००

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button