विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

विधान परिषद इतर कामकाज

मुंबई, दि. 24 :- विधान परिषद सभागृहातून येत्या 5 डिसेंबर 2022 रोजी निवृत्त होणाऱ्या सर्वश्री अमरनाथ अनंतराव राजूरकर (नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था), अनिल शिवाजीराव भोसले (पुणे स्थानिक प्राधिकारी संस्था), चंदूभाई विश्रामभाई पटेल (जळगाव स्थानिक प्राधिकारी संस्था), दुष्यंत सतीश चतुर्वेदी (यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था), डॉ.परिणय रमेश फुके (भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी संस्था) आणि मोहनराव श्रीपती कदम (सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी संस्था) या सहा सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला.

सभागृह नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री निरंजन डावखरे, अरूण लाड, सचिन अहिर, सुरेश धस, निलय नाईक तसेच उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या संसदीय आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या वतीने सर्वश्री मोहनराव कदम आणि डॉ.परिणय फुके यांनी सभागृहाचे आभार मानले.

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.