ब्रेकिंग न्युज

भविष्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वॉटर कप श्रमदानात सहभागी व्हा―खा. डॉ.प्रितमताई मुंडे

भतानवाडी येथे महाश्रमदानातून पाणी टंचाईवर मात करण्याचा संकल्प

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत सहभाग घेतलेल्या भतानवाडी ग्रामस्थांनी स्पर्धा सुरू झाल्यापासुन मोठ्या प्रमाणावर खोलीकरण, रूंदीकरण,वृक्ष लागवडीसाठी खड्डे तयार करून मोठे काम पुर्ण केले आहे. भतानवाडीकरांचा पाणी टंचाईवर मात करण्याच्या प्रयत्नांना अनेक दानशुर व्यक्ती, संस्था आणि शासनाने ही मदत करून पाठबळ दिले आहे.गुरूवार,दि.16 मे रोजी स्पर्धेच्या निमित्ताने महाश्रमदान आयोजित करण्यात आले होते.यात बीड जिल्ह्याच्या खा. डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी स्वतः सहभागी होत श्रमदान करून श्रमदात्यांना प्रोत्साहीत केले.

यावेळी त्यांनी गावकर्‍यांना प्रोत्साहित करताना सांगितले की, दुष्काळासारखी भिषण परिस्थिती भविष्यात उद्भवू नये म्हणुन पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी जिल्ह्यात व राज्यात जलयुक्त शिवार ही संकल्पना प्रभावीपणे राबविली.‘जलयुक्त शिवार' ही आता लोकचळवळ झाली आहे.आपला परिसर दुष्काळमुक्त आणि पाणीदार करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून भतानवाडी येथे झालेले जलसंधारणाचे काम कौतुकास्पद आहे. विठ्ठलराव भताने यांच्या मार्गदर्शनाखाली गावकर्‍यांनी या स्पर्धेत सहभाग घेवून गावाला भविष्यातील पाणी टंचाई व दुष्काळपासुन मुक्ती मिळविण्यासाठी केलेले कार्य स्तुत्य आहे. स्पर्धेच्या माध्यमातून परिसरातील पाणी आपल्याच पसिरात आडवून ठेवण्यासाठी एकजुटीने जलसंधारणाचे काम होत आहे.यासाठी भतानवाडीकरांचा सहभाग व महिला भगिनींचा उत्स्फुर्त प्रतिसाद याचे कौतुक करून त्यांनी भतानवाडीच्या सरपंच सौ.रूक्मीणीताई विठ्ठलराव भताने व उपसरपंच सौ. सावित्रीताई भताने व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे अभिनंदन केले.स्वतः श्रमदानात सहभाग घेतला. भतानवाडीकरांनी दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी दाखविलेली एकजुट नवा आदर्श निर्माण करणारी असल्याचे खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेने सुरु केलेल्या गाव पाणीदार करण्याच्या अभियानात भतानवाडीकरांनी यंदाही सहभाग नोंदवला.मानवलोक, भारतीय जैन संघटना, शासनाचा लघु पाटबंधारे विभाग, अंबाजोगाई पंचायत समिती,वन विभाग, भतानवाडी येथील जिल्हा परिषद शाळा, आंगणवाडी, ग्रामपंचायत,आरोग्य विभागाच्या आशा स्वयंसेविका व भतानवाडी येथील सर्व ग्रामस्थ यांनी एकत्र येत श्रमदान सुरू ठेवले आहे.भतानवाडी येथे 8 एप्रिल पासुन ते आज 16 मे पर्यंत खोल समपातळी चर हे 150 एकर मध्ये करण्यात आले आहेत.तसेच 150 एकर मध्ये वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यात आले आहेत. 24 जलशोषक चर तयार करण्यात आले आहेत.गुरूवारी झालेल्या महाश्रमदानात सहभाग घेवून खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांनी मदत म्हणुन 50 हजार रूपये तर जि.प.सदस्य संजय गिराम यांनी पाच हजार रूपये निधी भतानवाडीकरांना दिला.यावेळी अंबाजोगाई भाजपाचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख,परळी तालुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, युवानेते गणेश कराड, जि.प.सदस्य संजय गिराम,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, पंचायत समिती विस्तारधिकारी सावंत, पवार,वॉटरकप स्पर्धेचे तालुका समन्वयक बालाजी सुवर्णकार, शिवराज बागल, ग्रामसेवक साहेबराव भताने,तट,निकम,कृषी सहाय्यक चाटे साहेब, पंचायत समितीचे झाडे साहेब,गटनेते बंडु चाटे, ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भताने,बागझरीचे सरपंच विनोद लहाने, भतानवाडी येथील सरपंच सौ. रूक्मीणीताई विठ्ठल भताने,उपसरपंच साविञीताई भताने,सर्व ग्रा.पं.सदस्य,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन नागनाथ भताने,गोविंद कमल बहुउद्देशिय सेवाभावी संस्था (उजणी)चे संस्थापक सचिव अ‍ॅड.तुकाराम गायकवाड,पोलिस पाटील,दादासाहेब भताने,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बिराजदार,जलदुत ज्ञानदेव भताने,विद्याताई नागनाथ भताने, कविताताई मधुकर भताने,पर्यवेक्षिका एस.बी.गायकवाड, आशा स्वयंसेविका गोदावरीताई भताने, बचतगट प्रमुख गयाताई भताने आदींसहीत प्रतिष्ठीत नागरिक व समस्त भतानवाडी ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

दानशुर व्यक्ती व संस्थांनी मदत करावी

वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून भतानवाडी येथील जलसंधारणाच्या कामासाठी पोकलेन मशिन करिता डिझेल व जेसीबी मशिनची आवश्यकता आहे.तरी या कामी दानशुर व्यक्ती, संस्था यांनी पुढे यूवन भतानवाडीकरांना मदतीचा हात द्यावा व सहकार्य करावे असे आवाहन भतानवाडी गावच्या सरपंच सौ.रूक्मीणीताई विठ्ठलराव भताने यांनी केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.