आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. २९:- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या विजेत्यांमध्ये स्थान पटकावणाऱ्या राज्यातील तीन शिक्षकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
बीड जिल्ह्यातील दामुनाईकतांडा (ता. गेवराई) येथील जिल्हा परिषद शिक्षक शशिकांत कुलथे, याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कुलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांनी वर्ष २०२२साठीचे हे पुरस्कार पटकावले आहे.
‘या शिक्षकांची कामगिरी राज्याच्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव वाढविणारी आहे. या तिघांचे हे यश इतरांसाठी प्रेरणादायी आणि प्रोत्साहन ठरेल. यासाठी या सर्वांचा अभिमान आहे. तिघांचेही अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा’ असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.