आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. ५ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लालबागच्या राजास भेट देऊन गणरायाचे सहकुटुंब दर्शन घेतले.
यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सोनल शहा, खासदार मनोज कोटक, आमदार ॲड.आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते. यावेळी ट्रस्टच्या वतीने केंद्रीय मंत्री श्री. शाह यांचा सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री श्री. शाह यांनी लालबागच्या राजाच्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी यावेळी संवाद साधला.
मुंबईसह राज्यभरातील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे यंदाचे ८९ वे वर्ष आहे. लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री.राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे.