जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणी समितीवर अशासकीय सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचे आवाहन

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ६ : समाजातील अनिष्ट, अघोरी, अमानुष प्रथा बंद करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अमलात आला आहे. या कायद्याच्या जनजागृती – प्रचार कार्यक्रम अंमलबजावणीसाठीच्या समितीवर मुंबई उपनगर जिल्ह्याच्या दोन महिलांसह एकूण सात अशासकीय सदस्यांची नेमणूक करावयाची आहे. यासाठी संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी अर्ज करण्याचे आवाहन, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.

संस्कारातून रूजलेल्या गैरसमजुतीमुळे जातीयता, उच्चनिचता, गटपंथांमधील परस्पर द्वेष, स्त्री-पुरूष असमानता, दारिद्र्य अशा मानवतेसाठी घातक असणाऱ्या गोष्टी अजूनही समाजात अस्तित्वात आहेत. जादूटोणा विरोधी कायद्यामुळे लाखो माणसांचा होणारा छळ, शोषण व त्यांचे जीव वाचणार आहेत. समाजात प्रबोधन करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीवर सात अशासकीय सदस्यांचा नव्याने समावेश करून समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे.

इच्छुक व्यक्तींनी मुंबई उपनगर जिल्ह्यातील संबंधित संस्था अथवा व्यक्तींनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, नवीन प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर.सी.मार्ग., चेंबूर, मुंबई ७१ या पत्त्यावर किंवा ०२२-२५२२२०२३, [email protected]  या मेलवर संपर्क साधावा.

०००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.