औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यविशेष बातमी

औरंगाबाद: जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी कुपनलिका,मूर्तींना धोका

सोयगाव,दि.२१: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या पायथ्याशी चक्क कुपनलिका खोदणारे वाहन आणून या भागात अवैध कुपनलिका घेण्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आल्यावरून बसपाचे संघपाल सोनवणे यांनी तातडीने याप्रकारची जिल्हाधिकारी यांना तक्रार केली आहे.दरम्यान जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या पायथ्याशी खोदकामाचा हा प्रकार पुरातत्व विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणारा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जगप्रसिद्ध अजिंठ्याच्या लेणीला हादरा बसविणारा प्रकार पुरातत्व विभागाकडून करण्यात आला असून या भागात पाण्याच्या शोध घेण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे.परंतु याबाबत परवानगीचा प्रश्न गंभीर झाला आहे.संबंधित विभागाकडून या प्रकाराबाबत कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सोयगावला उघड झाले आहे.तहसील विभागात याबाबत चौकशी करण्यात आली असता ,याबाबत कोणताही परवानगी अर्ज आढळून आलेला नाही.त्यामुळे या कुपनलिका घेण्याचे काम संशय निर्माण करणारे ठरले आहे.दरम्यान जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत प्रदूषण टाळण्यासाठी व लेणीतील मूर्तींची झीज टाळण्यासाठी केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणावर ओप्रय्त्न केल्या जात असतांना मात्र चक्क लेणीच्या पायथ्याशी कुपनलिका घेणारी वाहनच उभे करण्यात येवून सर्रास कुपनलिका घेण्याचे काम हाती घेण्यात आल्याने या प्रकाराबाबत पर्यटक आश्चर्यचकित झाले आहे.या प्रकारची चौकशी करण्यात येऊन तातडीने संबंधितावर कारवाई करण्याची मागणी बसपाचे संघपाल सोनवणे यांनी केली आहे.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.