अकोला : सर्वधर्मिय सामाजिक एकता स्नेह भोजनात सर्वांनी घडविले एकतेचे दर्शन

अकोट शहरकरांची ह्या एकता सर्वांच्यासाठी प्रेरणादायी ठरणार : एम राकेश कलासागर

ठाणेदार संतोष महल्ले यांनी कार्यक्रम ठेवून सर्व समाजाचे लोकांना केले एकत्र

अकोट: अतिसंवेदनशील मानल्या जाते तसा आता अकोट शहर असा नाहीच आहे .या शहराकडे सर्वांचे लक्ष असतात .आता अकोट शहरात सर्वधर्मीय एकच भावनाने मनमिळावु पणे राहतात, याच पाहुन अकोट शहर पो स्टे चे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांनी स्वत्व सर्वधर्मीय सामाजिक एकता स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवून अकोट शहरातील सर्व धर्मीयाचे लोकांना एकत्र करून राष्ट्रीय एकात्मताचा संदेश दिले, या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधिक्षक एम राकेश कलासागर यांनी ह्या कार्यक्रम पाहुन यामध्ये अकोला जिल्ह्यात असा सर्वधर्मिय एकताचा कार्यक्रम असा झाला नसावे अकोट शहरात सर्वधर्मीय एकत्र झाले .आणि सर्वांनी ह्या भावना टिकवून आपला शहराचा नाव उज्जल नक्कीच होइल यात काही शंका पवित्र रमजान महिण्यातील रोजा उपवासामुळे मानवी जीवनात नैतिकमूल्या निर्माण करते त्यामुळे समाजात नैतिकता दॄढ होण्यास मदत व पुढे बोलतांना एम कलासागर म्हणाले की पवित्र रमजान महिण्यात समाजाला समता बंधभाव व एकतेचा संदेश दिला जातो कठीण नियम असलेल्या ,रोजा उपवासामुळे मानसामध्ये नैतिकता निर्माण होत.

असून सामाजिक एकताच देशाच्या प्रगतीच्या मार्ग असल्याचे सांगितले शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांची उत्कृष्ट विचारधारा व कामगिरी केल्याबद्दल त्यांचा कौतुक जिल्हा पोलीस अधीक्षक एम कलासागर यांनी केले पुढे म्हणाले की अशी शांतता व एकत्र पुढेही असाच राहणार असे .विचार व्यक्त केले या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून एल सी बी जिल्हा प्रमुख कैलास नागरे अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे तहसीलदार अशोक गिते न .पा. चे मुख्याधिकारी प्रशांत रोडे अकोट ग्रामीण पो. स्टे पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड़ यांची मंचकावर प्रामुख्याने उपस्थित होती. सर्वधर्मीय सामाजिक एकता भोजनाचे कार्यक्रम नव्हे तर आगळा वेगळा लग्न सारखाच कार्यक्रम घडविला अशी चर्चा अकोट शहरात जोरात जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वधर्मीय समाजाचे लोकामध्ये सुरेश अग्रवाल, एड काझी ,एड ब्रिजमोहन गांधी, सुनील सोमानी, मौलवी नईम साहब, प्रकाश गायकी ,कदीरभाई ठेकेदार, मिर्झा जुनेद बेग, अजहर शेख रमो आरिफ ,योगेश नाठे, सुभाष तेलगो,टे यांनी प्रत्येक सणात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार जिल्हा पोलिस अधीक्षक कलासागर यांच्या हस्ते करण्यात आला.

सर्वधर्मिय सामाजिक एकता स्नेह भोजनाचा सर्वांनी अस्वाद घेतला या कार्यक्रमाचा संचालन प्रकाश गायकी व शिक्षक नासिर शाह सर यांनी तर उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई यांनी मानले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अकोट शहर पो स्टे पोलीस अधिकारी व पोलिस कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.