आठवडा विशेष टीम― लोकसभा निवडणुक २०१९चा निकाल आज जाहीर होत आहे.बीड लोकसभा च्या जागेवर डॉ प्रितम गोपीनाथ मुंडे १ लाख ४४,०३१ मतांच्या आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे.
बजरंग सोनवणे यांना पिछाडीवर टाकत प्रितमताई मुंडे यांची लोकसभा निवडणुकीच्या निकालात विजयाकडे वाटचाल.तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा.विष्णू जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
- डॉ.प्रितम मुंडे – ५,७५,२२८
- बजरंग सोनवणे – ४,३१,१९७
- प्रा. विष्णू जाधव – ७९,०८३