जालनातून दानवे तर औरंगाबाद मधून इम्तियाज जलील विजयी !

जालना: आठवडा विशेष टीम―जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष विद्यमान खासदार श्री रावसाहेब पाटील दानवे पाचव्यांदा विजयी झाले असून, रावसाहेब दानवे यांना 698019 मते मिळाली व त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार विलास औताडेंना 365204 मते तर वंचित आघाडीचे उमेदवार शरदचंद्र वानखेडे यांना 77158 मते मिळाली आहेत. जालना लोकसभा मतदार संघातून औताडेंना पराभूत करीत 332815 मताधिक्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष विद्यमान खासदार रावसाहेब दानवे हे विजयी झाले आहेत.

औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून एमआयएम व वंचित आघाडीचे इम्तियाज जलील सय्यद हे पहिल्यांदा विजयी झाले असून, आमदार इम्तियाज जलील सय्यद यांना 389042 मते मिळाली व त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरेंना 384550 मते तर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 283798 मते मिळाली आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून खैरेंचा पराभूत करीत 4492 मताधिक्याने एमआयएम व वंचित आघाडीचे उमेदवार आमदार इम्तियाज जलील सय्यद हे विजयी झाले आहेत.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.