आठवडा विशेष टीम―सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने विजय मिळविला आहे. माढ्यातून भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांना पराभूत केले आहे. निंबाळकर यांनी हा विजय संयमी विचाराने स्वीकारणे अपेक्षित होते परंतु रणजितसिंह निंबाळकर यांनी अचानक वादग्रस्त विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांवर पातळी सोडून टीका केली आहे.
रणजितसिंह निंबाळकर हे माढ्यातून तब्बल ८५ हजारांच्या लिडने विजयी झाल्यानंतर त्यांच्या फलटण येथे विजयीसभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर जोरदार टीका केली.“मी ओरिजिनल नाईक निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर यात रणजितसिंहाच्या ९६ पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचे आणि वडिलाचे लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला एक हजाराचे बक्षिस देईन. रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात घेतले नव्हते. त्यामुळे मला वाईट बोलायचे नव्हते, परंतु बोलावे लागले”असे ते म्हणाले.