हरहुन्नरी, निखळ कलावंत गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. २१:- ‘रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत गमावला आहे,’अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ हास्य कलाकार, अभिनेता राजू श्रीवास्तव यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘आपल्या रोजच्या जगण्यातील दमछाक करणाऱ्या प्रसंगांतूनही हास्य फुलवण्याची किमया राजू श्रीवास्तव यांनी साध्य केली. त्यांनी हास्यरंगाच्या अनेक छटा उलगडून दाखवल्या. विनोद निर्मितीतून ते भाषा आणि प्रांत यांच्या सीमा ओलांडून घराघरांत पोहचले. त्यांनी कलाक्षेत्रातही रचनात्मक असे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनामुळे आपण हरहुन्नरी आणि निखळ असा कलावंत गमावला आहे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.