आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 21 : ‘आपण हसवतानाच चांगले वाटत होतात, रडवताना नाही’, अशा शब्दांत प्रसिद्ध हास्य कलाकार आणि अभिनेते राजू श्रीवास्तव यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, माझे मित्र हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या अकाली निधनाचा धक्का बसला. त्यांच्या जाण्याने लोकांना खळखळून हसविणारे व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. अगदी काही महिन्यांपूर्वी वर्सोवा फेस्टिव्हलमध्ये झालेली त्यांची भेट शेवटची ठरेल, असे वाटले नव्हते. त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. देशभरातील त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
००००