आठवडा विशेष टीम―
मुंबई,दि. २५ :- ‘ महाराष्ट्राच्या संत साहित्य आणि लोकसाहित्य परंपरेचा संशोधन, अभ्यासातून जागर घालणारा निस्सीम पाईक गमावला आहे,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री ज्येष्ठ प्रवचनकार, भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, वारकरी संप्रदायाचा वारसा जपतानाच डॉ. देखणे यांनी संत साहित्याचा, लोकसाहित्याचा आत्मियतेने अभ्यास केला. भारूड या लोकसाहित्याचा त्यांनी संशोधनात्मक ध्यास घेतला.हा विषय समजावून देण्यासाठी त्यांनी विदेशात जाऊन असंख्य कार्यक्रम केले. नव्या पिढीसाठी त्यांनी संशोधक, मार्गदर्शकाची भूमिका नेटाने निभावली. लोकसाहित्याविषयीची त्यांची तळमळ आणि संशोधन सदैव स्मरणात राहील. ज्येष्ठ प्रवचनकार, भारूडकार डॉ. रामचंद्र देखणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.’
0000