‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांची मुलाखत

आठवडा विशेष टीम―

मुंबईदि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र‘ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. रविवारदि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी  सायं 7.30 वा. ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.

यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

फेसबुक https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ आणि सेवा पंधरवडा याविषयी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे. राज्यातील नागरिकांना पारदर्शकगतीमानकालबद्ध सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ पारित करण्यात आला आहे. नागरिकांना अधिकार देणारा आणि प्रशासनाला उत्तरदायी करणारा हा क्रांतिकारी कायदा आहेअसे  मुख्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी सांगितले आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.