पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लम्पी रोगाने मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाईचे धनादेश वाटप

आठवडा विशेष टीम―

सातारा दि. 30 :   पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री  शंभूराज देसाई यांच्या हस्ते लम्पी रोगाने मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाईचे धनादेश वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डाँ.अंकुश परिहार यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि पशुपालक उपस्थित होते.

जिल्ह‌्यात आजपर्यंत एकूण 3,40,863 म्हणजेच 96% पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले असल्याची  माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी यावेळी दिली.

सातारा जिल्ह्यात एकूण 10 तालुक्यामध्ये लम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. आज अखेर 1472 गाय व 180 बैल असे एकूण 1652 जनावरांस लम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच आज दिनांक 30 सप्टेंबर 22  रोजी जिल्हयामध्ये 14 जनावरांचा मृत्यु झाला असून आज अखेर 87  गाई व 32 बैल असे एकूण 119 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. या सर्व जनावरांच्या मालकांस शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई देणयाची कार्यवाही सुरू आहे. एकूण 335 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत.

लम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत.

लम्पी चर्म रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.

0000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.