ग्रामीण भागातील संघटित व असंघटित कामगारापर्यंत पोहोचण्याचे काम अखंड सुरु

आठवडा विशेष टीम―

सांगली, दि. 03, (जि. मा. का.)  जत ही माझी कर्मभूमी आहे जतच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहीन. राज्याचा कामगार मंत्री या नात्याने ग्रामीण भागातील संघटित व असंघटित कामगारापर्यंत पोहोचण्याचे काम करत आहोत. सांगली जिल्ह्यामध्ये कामगारांसाठी ईएसआय हॉस्पिटल,कामगार भवन,कामगारांना घरे देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे  प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची केले.

अंकले येथे 11 केव्ही विद्युत उपकेंद्राचे भूमिपूजनलोक वर्गणीतून बांधलेल्या जिल्हा परिषद अंकले शाळा खोल्यांचे लोकार्पणअंकले गावासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत चार कोटी सत्तावीस लाख 45 हजार 592 रुपये किमतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, तहसीलदार जीवन बनसोडे, गट विकास अधिकारी दिनकर खरात, सरपंच संगीता चंदनशिवे, उपसरपंच विलास नाईक, संग्राम जगताप, सुलोचना माने यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद माजी पदाधिकारी हे उपस्थित होते.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रास्ताविक शंकरराव वगरे तर मनोगत व आभार माजी आमदार विलासराव जगताप यांनी मानले. या कार्यक्रमास अंकले गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुंभारी ग्रामपंचायतच्या वतीने पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांचा

नागरी सत्कार विविध विकासकामांचे  भूमीपूजन

जत तालुक्याच्या पाणी, रस्ते व अन्य समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. जतच्या नागरिकांना कधीही विसरणार नाही  विकास कामासाठी  निधी कमी पडू देणार नाही. अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी दिली.  कुंभारी ग्रामपंचायतच्या वतीने पालकमंत्री डॉ सुरेश खाडे  यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य स्नेहलता जाधव, सरपंच राजाराम जावीर, उपसरपंच प्रदीप कुमार जाधव, राजाराम गरुड, संग्राम जगतापग्रामपंचायत सदस्य व माजी पदाधिकारी हे उपस्थित होते.  

यावेळी  जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून जोतिर्लिंग मंदिर ते मारुती मंदिर रस्ता डांबरीकरणग्रामपंचायत ते सिध्देश्वर मंदिर रस्ता डांबरीकरण जिल्हा परिषदसांगलीजिल्हा नियोजन समिती मधून उभारण्यात येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभारीच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले.

०००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.