बीड (प्रतिनिधी): संपूर्ण महाराष्ट्रात मराठवाड्यासह विदर्भात भाजपाच्या सर्वाधिक जागा निवडून आले आहेत लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट व शिवसेना शिंदे गट यांचे लोकसभेमध्ये सर्वात कमी उमेदवार निवडून आलेले आहेत परंतु असे काय झाले ज्याने विधानसभेमध्ये यांच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असा प्रश्न विरोधी गटातील कार्यकर्त्यांमध्ये सध्या जोरदार चर्चेचा ठरलेला आहे. साप नेमका परिणाम जरांगे फॅक्टर आणि ओबीसी फॅक्टर यामुळे तर झाला नाही ना अशी भावना सामान्य व्यक्तींमध्ये दिसायला येत आहे परंतु नेमक्या कोणत्या कारणामुळे महायुतीच्या एवढ्या जागा निवडून आलेल्या आहेत याचा उलगडा आणखी देखील झालेला नाही.
महायुतीने सरकार मध्ये असताना लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची योजना सुरू केली तसेच लाडका भाऊ योजनेअंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात बेरोजगार तरुण व तरुणींना रोजगार देण्याचे काम करण्यात आले परंतु लाडका भाऊ योजनेमध्ये सर्वांना त्याचा लाभ भेटला असे झाले नाही व त्यामुळे त्याचा एवढा परिणाम या निवडणुकीवर झाला असेल असे दिसत नाही परंतु लाडकी बहीण योजनेमुळे सर्वाधिक फायदा झाल्याचे दिसून येत आहे. सरकारमधील मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे तसेच मोठ्या प्रमाणात आमदारांच्या देखील शपथा विधानसभेमध्ये घेण्यात आलेले आहेत विरोधकांनी शपथ न घेण्याचे देखील ठरवले होते. नुकत्याच घडलेल्या घडामोडी प्रमाणे शरद चंद्र पवार व काँग्रेस नेते तसेच विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी देखील मार्कडवाडी ला भेट दिली होती. या भेटीमुळे तेथील जनतेच्या समस्या तसेच मतदान प्रक्रियेवरील रोष त्यांना समजलाच असेल परंतु त्यातून काय निष्पन्न झाले? अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे जनतेला हवी आहेत. बीड जिल्ह्यात महायुतीचा वाट्याला सहापैकी पाच जागा आलेल्या आहेत. आता या पाच जागेवरील निवडून आलेले विधानसभेतील आमदार नेमकं या जनतेसाठी कोणत्या योजना आणतील तसेच पाण्याचा प्रश्न किती दिवसात सोडविण्यास समर्थ राहतील याकडे आता या मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागले आहे. आष्टी पाटोदा शिरूर मध्ये चौरंगी लढत झाली. तसेच अपक्ष उमेदवारांनी देखील घरोघरी जाऊन प्रचार करत निवडणूक लढवली होती परंतु जनतेने दिलेला कौल मान्य करत ते पुन्हा कामाला लागले आहेत.