प्रशासकीयब्रेकिंग न्युज

महाराष्ट्र टेक्न‍िकल टेक्सटाईल मिशनची स्थापना करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आठवडा विशेष टीम―

मुंबईदि. 30 : महाराष्ट्रात टेक्न‍िकल टेक्सटाईल मिशन (MTTM)ची स्थापना करणेमहाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची (MSTDC) स्थापना करणेनवी दिल्ली येथे आयोजित भारत टेक्स 2025 मध्ये सहभाग घेणेटेक्निकल टेक्सटाईल पार्कसाठी अभिरूची पत्रे  मागविणे तसेच स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करावीअशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हातमाग विणकरांना सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करण्याच्या दृष्टीने वृध्दापकाळासाठी निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी. राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी अर्बन हाट केंद्रांची स्थापना करण्याबाबत योजना तयार करावी. तसेच प्रसार भारती यांच्या सहकार्याने ‘करघा’ या  पारंपरिक वस्त्रोद्योग मालिकेचा पहिला भाग प्रसारीत करावा. वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचे डिजिटायझेशन आणि ऑटोमेशन करून  राज्यातील सूतगिरण्यांमध्ये प्राधान्याने सौर ऊर्जेचा वापर वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडेसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरेवस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकराज्यमंत्री योगेश कदममुख्य सचिव सुजाता सौनिकमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ताअपर मुख्य सचिव राजगोपाल देवराअपर मुख्य सचिव संजय सेठीमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडेप्रधान सचिव रणजीतसिंह देओलप्रधान सचिव एकनाथ डवलेमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशीसचिव विरेंद्र सिंहसचिव रविंद्र सिंहपरिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button