Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
सातारा, दि.२६ : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पार पडली.
या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक व समितीचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमध्ये क्रीडा संकुलाच्या विकासासाठी वाढीव निधी, बास्केटबॉल मैदान दुरुस्ती, व्यापारी संकुलासमोरील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण व वसतिगृह, संरक्षक भिंत रंगकाम करणे यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मल्लांच्या कुस्तीसाठी मातीचा स्वतंत्र आखाडा तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.
000