Last Updated by संपादक
आठवडा विशेष टीम―
सातारा दि. 22 : महाबळेश्वर येथील राजभवन परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या गिरी दर्शन बंगल्याचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी राज्यपालांचे प्रधान सचिव संतोषकुमार, विशेष कार्य अधिकारी महेश गोलाणी, अरुण आनंदकर, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे मंडळाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता सुरेंद्र कुमार काटकर आदी उपस्थित होते.
००००