बीड: झेेडपीची विद्यार्थ्यांची संख्या 9 हजाराने वाढली,गणवेश वाटपाला सुरूवात जुलै अखेरपर्यंत सर्वांना गणवेश मिळणार

यंदा गणवेशावर खर्च होणार आठ कोटी

शिक्षण सभापतींसह सीईओंनी यंत्रणा गतिमान केली

बीड:आठवडा विशेष टीम―पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे आणि खा. प्रितमताई यांचे जिल्हा परिषदेकडे बारीक लक्ष आहे, त्यामुळे सर्व सभापती चांगल्या पध्दतीने काम करीत आहेत. शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांचीही कामगिरी महत्वाची ठरू लागली आहे, कारण त्यांच्यासह सीईओ अमोल येडगे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद शाळांना ‘अच्छे दिन आले असेच मनावे लागले, कारण यंदाच्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यास त्यांना यश आले आहे. 17 जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत, त्यानुसार याठिकाणी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याचीही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, यंदा गणवेशावर तब्बल आठ कोटी रूपये खर्च होणार आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी गणवेशाचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या नऊ हजाराने वाढली आहे, येत्या जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या अंगावर गणवेश दिसेल, असा विश्‍वास शिक्षण सभापतींनी बोलून दाखविला आहे.

आज माहिती आणि तंत्रज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात झपाटट्याने बदल होत चालला आहे, त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या शाळांकडे पाठ फिरवून पालकांनी आपला ओढा इंग्रजी शाळांकडे वळविलेला आहे, त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याची वेळही येत आहे, जिल्हा परिषदेच्या शाळातील हीच गळती थांबविण्यासाठी स्वत: पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे आणि खा.प्रितमताई मुंडे यांनी लक्ष घातले, त्यानुसार ना. पंकजाताईंनी शाळा दुरूस्तीसाठी तब्बल 25 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला, त्याचबरोबर खा. प्रितमताईंनीही आपल्या फंंडातील एक कोटी रूपये या कामासाठी दिले, मुंडे भगिणींचे हेच काम लक्षात घेवून शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, सीईओ अमोल येडगे आणि शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या शाळातील गळती थांबविण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे समोर येत आहे. 17 जूनपासून जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे या शाळेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याची प्रक्रियाही हाती घेण्यात आली आहे, मागच्या वर्षी 1 लाख 15 हजार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आला होता, त्यासाठी तब्बल सात कोटी रूपये खर्च आला होता, यामध्ये ओपन आणि ओबीसी वर्गातील 65 हजार विद्यार्थ्यांना समावेश होता, गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी गणवेशासाठी पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 24 हजारांवर गेली आहे, म्हणजेच गणवेशाचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या नऊ हजारांने वाढली आहे, यासाठी तब्बल आठ कोटींचा खर्च येणार आहे. यामध्ये 58 ते 60 हजार ओपन आणि ओबीसी विद्यार्थ्यांचा समावेश आहे, येत्या जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांच्या अंगावर गणवेश दिसेल, असा विश्‍वास शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी बोलून दाखविला आहे. त्या धरर्तीवरच सध्या शिक्षण सभापती, सीईओ आणि शिक्षणाधिकार्‍यांनी आपली सर्व यंत्रणा गतीमान केली आहे.

एकही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही : देशमुख

गणवेश वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र विद्यार्थ्यांना आम्ही गणवेश उपलब्ध करून देणार आहोत, यात एकही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही, असे शिक्षणसभापती राजेसाहेब देशमुख यांनी म्हटले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.