राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुंबई विमानतळावर आगमन व स्वागत

Last Updated by संपादक

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. ०६ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज दुपारी मुंबई दौऱ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती महोदयांचे स्वागत केले. भारतीय सैन्य दलाच्या तीनही दलांच्या वतीने यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांना मानवंदना देण्यात आली.

नागपूर येथील विविध कार्यक्रम आटोपून राष्ट्रपती मुर्मू यांचे दुपारी येथे आगमन झाले.  मुंबई येथील दौऱ्यात राष्ट्रपती महोदया सिद्धीविनायक मंदिर येथे भेट देऊन दर्शन घेणार आहेत, त्यानंतर राजभवन येथे त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ आयोजित स्वागत समारंभास उपस्थित राहणार आहेत. a87a0616 1d83 4ab4 928a 357da2622dd6

65b675ba 2b5e 480a be14 9e3660eb59af

0000

 

श्री.दीपक चव्हाण /वि.सं.अ/

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.