हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीला बांधले ; आमदार नितेश राणेंचा आक्रमक पवित्रा

कणकवली:आठवडा विशेष टीम― दि.०४ : आमदार नितेश राणे यांनी हायवे रस्ता पाहणी करताना हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची आंघोळ घालत गडनदी पुलाला बांधून घातले. हायवे सर्विस रोड तुझा बाप बांधणार का असा सवाल करत अनेक प्रश्नांचा भडीमार केला.
मुंबई-गोवा महामार्गावर चिखल खड्डे यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या रोषाला आज महामार्ग उप अभियंता प्रकाश खेडेकर यांना सामोरे जावे लागले. आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी खेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज जो चिखल मारा सहन करतोय तो तुम्ही पण आज अनुभवावा असे म्हणत आमदारांनी शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या तसेच संपूर्ण कणकवली नगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असे सांगत आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जाणवली पूल पर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्डयांची वस्तुस्थिती दाखवली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.