आठवडा विशेष | वार्ताहर
परळी: बीड एलसीबी पथकाचे पी.आय.पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी टीमने मोटर सायकल चोरी करणाऱ्या एकास अटक केली असुन त्याच्या कडुन दोन मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी एपीआय अमोल धस पोलीस कर्मचारी तुळशीराम जगताप, सखाराम पवार, साजिद पठाण यांनी बीड येथून येऊन केली बीडचे एलसीबी पथक,परळी शहरांमध्ये येवुन मोटरसायकल चोरावर धडक कारवाई केली तर या कारवाईने अनेक मोटारसायकल चोरीची माहिती अटक केलेल्या चोरा कडुन मिळण्याची शक्यता एलसीबी पथकाने व्यक्त केली आहे.