सोयगाव: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांचा वाढदिवस मंगळवारी दि९रोजी तालुकाभर वृक्ष लागवड मोहिमेद्वारे साजरा करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष विजय काळे यांनी घेतला आहे.दरम्यान या उपक्रमातून शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेत मराठा प्रतिष्ठानने सहभाग नोंदवून शासनाच्या यंत्रणांची भंबेरी उडाली आहे. सामाजिक कार्यात मोलाचा सहभाग असलेल्या जिल्हाभर ख्याती असलेल्या मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपान गव्हांडे यांचा वाढदिवस मंगळवारी वृक्ष लागवड मोहिमेद्वारे साजरा करण्यात येणार व सरकारी दवाखान्यात फळे खाऊ वाटप करण्यात येणार आहे असल्याचा निर्णय प्रतिष्ठानने घेत पर्यावरण संतुलनाचा संदेश वाढदिवशी देण्यात येणार आहे. सोयगाव,जरंडी,बहुलखेडा,घोसला,बनोटी,वाकडी,किन्ही आदी ठिकाणी तब्बल पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा संकल्प प्रतिष्ठानने केला आहे,याकामी जिल्हाध्यक्ष विजय काळे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडू युवरे तालुकाध्यक्ष विजय चौधरी,तालुकाउपाध्यक्ष समाधान जाधव,सचिव सचिन महाजन,खजिनदार आपा वाघ,गुणवंत ढमाले,बबलू बावस्कर, प्रकाश गव्हांडे , अमोल बोरसे, नाना जुनघरे, नाना गवळी ,सुनिल ढमाले , प्रमोद वाघ ,गणेश गवळी ,प्रसिद्धी प्रमुख समाधान शिंदे,यादवकुमार शिंदे, भरत पगारे,समाधान घुले ,सुनिल काळे ,सुलेमान शेख,शेख गुलाब आदी पुढाकार घेत आहे.