पाटोदा:शेख महेशर―पाटोदा येथील गायकवाड क्लासेसचा २१ वा वर्धापन दिन व ज्युनिअर आय.ए.एस. स्पर्धा परिक्षा २०१८ – २०१९ चे बक्षीस व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते रेणुका माता मंदिर सभागृहात संपन्न झाला. या वेळी कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी भामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एल.आर. जाधव (सर) हे होते.
या प्रसंगी बोलताना जाधव सर म्हणाले की पालकांनी प्राँपटीपेक्षा मुलाची प्रगती करणे काळाची गरज आहे. तर या वेळी एम.आर.नागरगोजे सर यांनी मार्गदर्शन करताना आजच्या विद्यार्थ्यांना पालकांनी मोबाईल व टि.वी.पासुन दुर ठेवावे असे म्हटले. या वेळी दलित मित्र अब्दुल समद भाई , श्री.अरुण शेठ कांकरिया , निजाम फौजी , श्री.खाडे सर , श्री.भरत मगर सर ,श्री.विजय जाधव , पत्रकार हमीदखान पठाण , सय्यद सिंकदर , शेख इलियास , श्री.शिंदे संदीप ( मुन्ना ) सौ.वास्कर मॅडम , सौ.शेख मॅडम , सौ.गायकवाड मॅडम यांच्या सह बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्ता वाघमारे यांनी केले तर प्रास्ताविक नवनिर्माण शाळेचे मुख्याध्यापक पठाण नईम सर यांनी केले. शेवटी आभार गायकवाड क्लासेसचे संचालक श्री.सचिन गायकवाड सर यांनी मानले.