आठवडा विशेष टीम―
धुळे, दिनांक 1 मे 2025 (जिमाका वृत्त) :धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्हावासियांचे जीवनमान सुकर होण्यासाठी सदैव तत्पर राहीन, अशी ठाम ग्वाही राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापनादिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी आमदार अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी रोहन कुंवर, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, सीमा अहिरे, संजय बागडे, महादेव खेडकर, कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, तहसिलदार अरुण शेवाळे, पंकज पवार, अपर तहसिलदार वैशाली हिंगे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरीक, माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. रावल आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, महाराष्ट्र राज्याला संत, महापुरुषांच्या विचारांचा समृद्ध असा वारसा लाभला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-किल्ले या ऐतिहासिक ठेव्याची साक्ष देतात, संत-महंतांच्या विचारांचा, आणि कवी गोविंदाग्रज ऊर्फ राम गणेश गडकरी यांच्या कवितांचा उल्लेख करत त्यांनी राज्याचा सांस्कृतिक ठेवा अधोरेखित केला. मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी 105 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करत त्यांनी हुतात्मा चौकातील स्मारकाला अभिवादन केले. याशिवाय, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारची विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगून ते म्हणाले की,
शेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव योजना
भारतीय शेती ही सर्वस्वी मोसमी पावसावर अवलंबून आहे. यंदाचा पावसाळा समाधानकारक असेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. ही आपल्यासाठी दिलासादायक आणि समाधानाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जय्यत तयारी केली आहे. खरीप पीक कर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात 1 लाख 61 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी करुन शेतकरी आयडी प्राप्त केला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधीचा 1 लाख 62 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत 73 शेतकऱ्यांना 1 कोटी 42 लाख अनुदान देण्यात आले. राष्ट्रीय कृषि विकास योजनेत 8 हजार 318 शेतकऱ्यांना 5426.51 लाख रुपयांचे अनुदान दिले. कृषि यांत्रिकीकरण उपअभियानात 271 शेतकऱ्यांना 260.11 लाख रक्कमेची कृषि औजारे दिली. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेत 91 हजार 298 शेतकऱ्यांना 165.93 कोटी रुपयांची वीज बिल सवलत दिली आहे. जिल्ह्यात 21 वी पशूगणना पूर्ण झाली आहे. दुध दरावरील सबसिडी 5 रुपयांवरुन 7 रुपये करण्यात आली असून त्याचा लाभ 54 लाख लाभार्थ्यांना झाला आहे.
जिल्हास्तरासह मंडळस्तरावरही छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन
राज्य शासनामार्फत नागरीकांना अधिक सेवा मिळण्यासाठी जिल्हास्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येते. यापुढे हे अभियान प्रत्येक मंडळस्तरावर राबविण्यात येणार असून याकरीता 25 हजार रुपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर जिवंत सातबारा मोहिम सुरु केली असून या मोहिमेत जिल्ह्यात 8 हजार पेक्षा अधिक मयत खातेदारांच्या नोंदी अद्यावतीकरणाचे काम सुरु आहे. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी त्यांना नवीन वाहने उपलब्ध करुन देण्यात आले आहे. शासनाच्या पणन विभागामार्फत 3 हजार 588 शेतकऱ्यांना 14 कोटी 63 लाख कांदा अनुदानाची रक्कम दिली आहे. यावर्षी शासनाने सोयाबीन व तुरीची विक्रमी खरेदी केली आहे. अटल अर्थसहाय्य योजनेतंर्गत 30 सहकारी संस्थांना मंजुरी दिली असून पैकी 16 संस्थांना प्रकल्प उभारणीसाठी 1 कोटी 5 लाखाचे कर्ज व अनुदान मंजुर केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्हा आघाडीवर
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 अंतर्गत 60 हजार घरकुले पूर्ण झाली आहे. पीएमआवास योजना ग्रामीण टप्पा 2 अतंर्गत 90 हजार घरकुलांना मंजुरी दिली. त्यातील 81 हजार लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत केला. शबरी आवास योजनेत 11 हजार 706, रमाई आवास योजनेत 8 हजार घरकुले पूर्ण झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 48 हजार 733 कुटूंबाचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले असून सर्व्हेक्षणाच्या कामात आपला धुळे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महिलांचे सशक्तीकरण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात 5 लाख 25 हजारापेक्षा अधिक अर्ज पात्र ठरले. पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयेप्रमाणे रक्कम खात्यावर जमा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत जिल्ह्यातील 800 पेक्षा अधिक लाभार्थी नुकतेच अयोध्येत जाऊन प्रभु श्रीरामाचे दर्शन घेऊन आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत जिल्ह्यात 14 हजार 600 महिला बचतगटांच्या माध्यमातून 1 लाख 50 हजार कुटूंबे जोडली गेली. या बचतगटांना आतापर्यंत बॅकांमार्फत 535 कोटींचे अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. या मदतीच्या माध्यमातून 8 हजार महिलांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लखपती दिदी या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील 67 हजार महिलांनी एक लाखाहून अधिक उत्पन्न घेतले आहे. गावपातळीवर महिलांना मार्गदर्शन आणि सेवा पुरविण्यासाठी कृषी सखी, पशू सखी, बॅक सखी, महिला सखी गावोगावी महिलांना शेती, पशुपालन, उद्योग, बॅकींग व्यवहाराबाबत माहिती देत आहे.
औद्योगिक विकास आणि रोजगारनिर्मिती
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला अधिक गती यावी याकरीता धुळे शहरात नुकतीच गुंतवणूक परिषद पार पडली. या गुंतवणूक परिषदेत विविध राज्यातील अनेक क्षेत्रातील 144 कंपन्यांनी 8 हजार 828 कोटी रुपयांचे गुंतवणूक सामंजस्य करार केले. यामुळे जिल्ह्यात 13 हजार 378 जणांना रोजगार निर्मिती होणार आहे.
शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम आणि अधिकाऱ्यांची कौतुकास्पद कामगिरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम सुरु आहे. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्त्वाखाली या आराखड्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यात ई-ग्राम संवाद साधुन गावातील मुलभूत समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या शंभर दिवसांच्या आराखड्यातंर्गत राबविलेल्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले आहे. दहावी व बारावी परिक्षेचे ऑनलाईन लिंकद्वारे सनियंत्रण करुन धुळे जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविले आहे. बाल संरक्षण क्षेत्रात आपल्या जिल्ह्याने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आपल्या जिल्ह्यास चार बालस्नेही पुरस्कार प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, उत्कृष्ट जिल्हा महिला व बालविकास कार्यालय तसेच उत्कृष्ट बाल कल्याण समिती, धुळे यांना तर राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धेत ग्रामपंचायत गटात आपल्या धुळे जिल्ह्यातील बोराडी, ता. शिरपूर ग्रामपंचायतीस राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच सन 2022-2023 या वर्षांसाठी ग्रामपंचायत कर्ले, ता. शिंदखेडा, सन 2023-2024 साठी ग्रामपंचायत चौगांव, ता. धुळे यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच आपल्या जिल्ह्याची दिव्यांग खेळाडू कु. वैष्णवी मोरे हीला आंतरराष्ट्रीय ज्यूदोपटू 2023-2024 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत धुळ्यातील मोहिनी सुर्यवंशी, श्रीतेश पटेल यांची निवड झाल्याने त्यांचे जिल्हावासीयांच्यावतीने अभिनंदन केले.
जिल्ह्याच्या विकासासाठी सन 2025-2026 या वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 348 कोटी, आदिवासी उपयोजना 153 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेत 32 कोटी असे एकूण 543 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून जिल्ह्यात भविष्यात अधिक विकासात्मक कामे उभी राहून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यांचा झाला सन्मान….
यावेळी आदर्श तलाठी पुरस्कार राकेश भोई, धुळे पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल व पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश देवरे, सुधीर सोनवणे, पोलीस हवालदार ललीत पाटील, कांतिलाल अहिरे, विशाल मोहने, महिला पोलीस उप निरिक्षक लक्ष्मी करंकार, पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाकूर, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे सहायक पोलीस उपनिरिक्षक विशाल पाटील यांना पालकमंत्री श्री.रावल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे द्वारा सन 2023-2024 व सन 2024-2025 या वर्षांसाठी खेळाडु व क्रीडा मार्गदर्शक यांना जिल्हा गुणवंत खेळाडु (महिला) पुरस्कार पुर्वा दिलीप निकम, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक म्हणून राजेंद्र बळीराम शिंदे, जिल्हा गुणवंत खेळाडू (पुरुष) पुरस्कार प्रथमेश अमरीश देवरे, जिल्हा गुणवंत खेळाडू (महिला) पुरस्कार कु. अनुराधा दिलीप चौधरी, जिल्हा गुणवंत दिव्यांग खेळाडू राहुल ईश्वर बैसाणे, जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार सुकदेव गोरख भिल यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धुळे द्वारा सन 2023-2024 व सन 2024-2025 या वर्षांसाठी खेळाडु व क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
तसेच सन 2022-2023, 2023-24, 2024-2025 वर्षासाठी युवक, युवती व संस्थांना जिल्हा युवा पुरस्कार जाहीर झाला यात जिल्हा युवा पुरस्कार (युवती) ॲड. शितल जावरे, जिल्हा युवा पुरस्कार (युवक) सागर राजेंद्र पटेल, जिल्हा युवा पुरस्कार (युवती) कु.सुवर्णा भालचंद्र देसले, जिल्हा युवा पुरस्कार (युवक) प्रकाश शरद पाटील, जिल्हा युवा पुरस्कार (युवती) कु.वृदावना भीमराव पाटील तसेच जिल्हा युवा पुरस्कार (संस्था) इंदीरा महिला मंडळ वलवाडी ता.जि.धुळे अध्यक्षा प्रभा परदेशी यांना पालकमंत्री श्री.रावल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमाक 6, धुळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे जिल्हा पोलीस दल (पुरुष), धुळे जिल्हा पोलीस दल (महिला), पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे, होमगार्ड (पुरुष व महिला), धुळे पोलीस व एसआरपीएफ संयुक्तीक बँड पथक, श्वान पथक (सॅम) मोबाईल फॉरेन्सिक इन्हेुळस्टीगेशन व्हॅन, पोलीस विभागाचे चलचित्र वाहन, वैद्यकीय पथक, अग्निशामक दल आदी संचलनात सहभागी झाले. संचलनाचे नेतृत्व परिविक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सागर देशमुख यांनी केले. यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत वाजविले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकाशवाणीच्या पुनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.
भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
प्रांरभी मान्यवरांच्या हस्ते धुळे पोलिस कवायत मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण तसेच धुळे महानगरपालिकेच्यावतीने १५ व्या वित्त आयोगातंर्गत पोलीस मुख्यालय, धुळे येथे बांधण्यात येणाऱ्या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे भूमिपूजन, पोलीस दल व एबी फाऊंडेशनच्यावतीने पोलीस कुटूंबियांसाठी राबविलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन, तसेच धुळे येथे शासकीय गुलमोहर विश्रामगृह परिसरात अतिमहत्वाचे व्यक्तींकरीता नवीन व्ही.आय.पी. विश्रामगृहाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
00000