सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव तालुक्यात खरिपाच्या हंगाम संकटात सापडल्याने शेतकऱ्यांना गावातच मार्गदर्शन व उपाय योजना मिळाव्या यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कृषी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्यावरून या निर्णयाची अंमलबजावणी जरंडी ता.सोयगाव येथून सोमवारी करण्यात आली.
जरंडी ता.सोयगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कृषी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली यावेळी मंडळ अधिकारी संगीता पवार,पंचायत समितीचे सदस्य संजीवन सोनवणे,जीवन तायडे,शांताराम पाटील,अरुण हिवाळे,अविनाश राठोड,संतोष पाटील,सचिन आंबेकर आदींची उपस्थिती होती.