नवनिर्माण प्राथमिक शाळा पाटोदा येथे ७३वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

पाटोदा:शेख महेशर―पाटोदा शहरातील नवनिर्माण प्राथमिक शाळा, लाल हनुमान मंदिर क्रांतीनगर या शाळेत ७३ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. विजयाताई जायभाये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.पाटोदा शहरात प्रभात फेरी संपन्न झाल्या नंतर शाळेच्या प्रांगणात विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा व विद्यार्थ्यांच्या भाषणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मध्ये इंग्रजी स्पेलिंग पाठांतर स्पर्धा, राजश्री शाहू महाराज मासिक स्पर्धा परीक्षा या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.डॉ. नागनाथ राऊत यांनी या स्पर्धेच्या बक्षिसाचे प्रायोजकत्व स्वीकारले.सदरील शाळेत होणाऱ्या विविध स्पर्धांचे प्रायोजकत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष श्री.नामदेव सानप यांनी स्विकारल्याचे मनोदय व्यक्त केला. तसेच पाटोदा कराटे प्रशिक्षक कंकरसिंग टाक यांनी शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत संपूर्ण कराटे प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली.
या कार्यक्रम प्रसंगी दंत रोग तज्ञ डॉ.राऊत, डॉ.इम्रान शेख, मनसे.तालुकाध्यक्ष नामदेव सानप, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.जायभाये ताई, माजी सैनिक सय्यद निजाम भाई, लष्करी जवान श्री.मोहन बांगर, सौ.बुराडे ताई, डोरले ताई, पवळ ताई, रामदास गीते, सुनील लाड, इरफान शेख इत्यादी पालकांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री.नईम पठाण (सर) यांनी केले तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.जितेंद्र मोरे (सर) यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती चंद्ररेखा बडे मॅडम, यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री गाढवे सर, श्री भोसले सर, श्री.डोके सर, श्री.बोराडे सर, श्री.जायभाये सर, श्रीमती मस्के मॅडम, श्रीमती सानप मॅडम, श्रीमती भोसले मॅडम, श्री प्रकाश सोनवणे यांनी प्रयत्न केले. सदरील कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री नईम पठाण (सर) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या वेळी कर्मचारी वर्गा सह परिसरातील बहुसंख्येने पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.