अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―ऑक्टोबर-2019 मध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या पुर्व तयारी संदर्भात,बुथ बांधणीचा आढावा तसेच त्या बाबतचा अहवाल प्रदेश कार्यालयास पाठविणे आणि बीड जिल्ह्याच्या पुर्व भागातील परळी, केज व माजलगाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक डॉ.बालाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवार,दि.22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह अंबाजोगाई या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.या बैठकीस संभाजी ब्रिगेडच्या बीड पुर्व मधील पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड बीड पुर्वचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले,जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी केले आहे.
विधानसभेसाठी इच्छुकांनी संपर्क साधावा-संभाजी ब्रिगेड
बीड जिल्ह्याच्या पुर्व भागातील परळी,केज व माजलगाव विधानसभा मतदारसंघात संभाजी ब्रिगेडकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यासंदर्भात जे युवक,युवती व मान्यवर लोक इच्छूक असतील त्यांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन संभाजी ब्रिगेड बीड पुर्वचे जिल्हाध्यक्ष गोविंद पोतंगले,जिल्हा कार्याध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी केले आहे.