प्रशासकीयब्रेकिंग न्युज

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे मोफत प्रदर्शन – मंत्री ॲड. आशिष शेलार

आठवडा विशेष टीम―

कोल्हापूर, दि. २८ : येत्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे जुने मराठी सिनेमे प्रेक्षकांना मोफत पाहण्याची संधी मिळणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

कोल्हापूर येथे सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम ‘चित्रसूर्य’ पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमल महाडिक, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, विभीषण चवरे, सूर्यकांत मांढरे यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच नागरिक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सूर्यकांत मांढरे यांचे जुने चित्रपट प्रखर राष्ट्रवाद, देव, देश, धर्म, समाज बांधणी, समाजातील विघटन वाद संपणे यांना प्रेरणा देणारे आहेत. यावेळी मांढरे यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

‘चित्रसूर्य’ कार्यक्रमातून अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या आठवणींना उजाळा

शाहू स्मारक, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमातील संहिता लेखन आणि संशोधन डॉ. सुवर्णा चवरे यांनी केले तर, संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले. निवेदन सीमा देशमुख आणि श्रीरंग देशमुख यांनी केले. कार्यक्रमात मांढरे यांनी मराठी सिनेमात दिलेल्या योगदानाबाबत माहिती देण्यात आली.

सूर्यकांत यांच्यावर चित्रीत झालेली गाणी गायक मयूर सुकाळे, अभिषेक तेलंग, मधुरा कुंभार, शेफाली कुलकर्णी, पियुषा कुलकर्णी आणि कार्तिकी गायकवाड यांनी सादर केली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button