सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सोयगाव तालुक्यात मका पिके बारा ते सतरा दिवसांचे असतांनाच लष्करी अळींचा प्रादुर्भाव आढळून आला होता.परंतु यावर प्रतिबंध न झाल्याने आणि कृषी विभागाला आलेल्या अपयशयाने अखेरीस बहरलेल्या मक्याच्या कणीसमध्ये अळींनी प्रवेश केला असल्याचे चित्र आढळून आले आहे.त्यामुळे यंदाच्या हंगामातील शेतकऱ्यांचा मका जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त झाला आहे.
सोयगाव तालुक्यात यंदाच्या हंगामात सहा हजार हेक्टरवर मक्याची लागवड करण्यात आलेली आहे.मका ओपिके उगवून आल्यानंतर अवघ्या अकरा ते सतरा दिवसांची असतांना मका पिकांवर लष्करी अळींनी विळखा घातला होता.यासाठी तालुका कृषी विभाग,महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने उपाय योजनांसाठी कार्यशाळा घेतल्या,परंतु नियंत्रणासाठी मात्र उपाय योजना न झाल्याने अनियंत्रित झालेल्या लष्करी अळींचा प्रवेश बहरलेल्या मका पिकांमध्ये झाल्याचे आढळून आले आहे.दरम्यान मक्याच्या थेट कणीस मध्ये अळींनी प्रवेश केला तरीही प्रशासनाची उपाय योजना कुचकामी ठरून शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.मका पिकांवरील लष्करी अळींच्या नुकसानीची पातळी उगवण क्षमतेपासूनच वाढली असतांना प्रशासन मात्र कागदोपत्री उपाय योजनांवर भर देत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे.