बीड: अंबाजोगाईत परिचारीका सेवा संघाची निदर्शने

प्रलंबित मागण्यांचे उपजिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांना दिले निवेदन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―महाराष्ट्रातील परिचारिकांच्या राज्यव्यापी,स्थानिक मागण्या आणि दैनंदिन कामातील अडचणी सोडविण्याबाबत यापुर्वी
महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन,पुणे यांच्या मार्गदर्शनानुसार बैठकीत ठरल्याप्रमाणे
महाराष्ट्र राज्य परिचारीका सेवा संघाच्या वतीने परिषदा, धरणे,मोर्चा आदींप्रकारे आंदोलने केली.परंतु,या बाबत शासनाने धोरणात्मक निर्णय न घेतल्याने त्या मागण्या प्रलंबित आहेत.या मागण्यांची सोडवणूक व्हावी यासाठी राज्यव्यापी व स्थानिक अशा एकूण 14 विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य परिचारीका सेवा संघाच्या वतीने मंगळवार,दि.27 ऑगस्ट रोजी स्वाराती रूग्णालय परिसरात बाह्यरूग्ण कक्षासमोर जोरदार घोषणाबाजीत निदर्शन आंदोलन करण्यात आले.तसेच सदरील मागण्यांची निवेदने ही प्रधान सचिव, उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई,संचालक व स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता यांना देण्यात आले.

देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जे निर्णय झाले त्यांची अमंलबजावणी होत नाही.त्यामुळे परिचारीकांच्या प्रलंबीत मागण्यांसाठी संघटीत कृतीद्वारा आपले लक्ष वेधण्यासाठी निवेदन करीत आहोत.या निवेदनाचा सहानुभूतीपुर्वक विचार व्हावा तसेच मागण्यांची पुर्तता व्हावी अशी अपेक्षा निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात करण्यात आलेल्या राज्यव्यापी मागण्या अशा 2005 पासून परिचर्या संवर्गाला जुनी पेन्शन योजना लागू करावी, रूग्णसेवेसाठी लागणा-या वस्तू, यंञसामुग्री,औषधे,
मनुष्यबळ यांचा सुलभ पुरवठा व्हावा, परिचारिकांची सर्व स्तरांवरील रिक्तपदे तात्काळ भरावीत,बदली धोरणातून परिचारीकांना वगळावे, सहाव्या वेतन आयोगाच्या ञुटी दूर करून भत्यासह सातवा वेतन आयोग मिळावा, परिचारिकांना कामावर सुरक्षा द्यावी, परिचारिकांना रूग्ण सेवे व्यक्तीरीक्त अन्य काम देवू नयेत,सर्व परिचारीकांचे सेवा पुस्तके,आर्थिक थकबाकी,सेवानिवृत्तीचे पेंशन सहीत कामे त्वरीत व्हावीत.इंडियन नर्सिंग कौन्सीलच्या प्रमाणकानुसार पदे निर्माण करून भरावीत, बंधपञित परिचारीकांना सेवेत सामावून घ्यावे, जनरल नर्सिंग अभ्यासक्रम पुर्ववत सुरू ठेवावेत,50 वर्षे सातत्याने कार्यरत असल्याचा महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनला राजमान्यता प्रस्तावाप्रमाणे मिळावी,पी.एच.एन.पिडेट्रीक,सायकीयेट्रीक,
परिचारिकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळावी,महाराष्ट्रात परिचारीकांचा गणवेश सर्व संवर्गासाठी एकच असावा तसेच स्वतंञ संचालनालयाची मागणी केंद्र शासनाने मान्य केली आहे.त्याचे आदेश मिळावेत आदी विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदनावर महाराष्ट्र राज्य परिचारीका सेवा संघ,अंबाजोगाईच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा विश्वासराव सौताडेकर, सचिव श्रीमती रागिणी देविदास पवार यांच्या स्वाक्ष-या आहेत.तर निवेदन देताना व निदर्शने करताना उपाध्यक्ष मंगेश सुरवसे, सहसचिव रामराव फड,संघटक श्रीमती शारदा गित्ते,सदस्य महानंदा सरवदे,खेलबा गोचडे,राम कुर्‍हाडे, छाया गायकवाड,उल्का शेकटकर,श्रीमती निता घोडके तसेच परीसेविका चिञरेखा बांगर,आशा माने,सुमन नाकाडे,सिंधू केंद्रे,माया गायकवाड,अलका मोरे,पुष्पा महल्ले,मनोरमा चाटे,पुष्पा मुळे आदींची उपस्थिती होती.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.