अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― येथील प्रशांतनगर भागात असणा-या भारतीय स्टेट बँक (एस.बी.आय) शाखेतील ग्राहकांची होत असलेली गैरसोय दुर करून ग्राहकांना दर्जेदार व तत्पर बँकींग सेवा मिळावी.अशा मागणीचे निवेदन देवळा श्रमकरी ग्रुपच्या वतीने भारतीय स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक यांना बुधवार,दि.28 ऑगस्ट रोजी देण्यात आले.
देवळा येथील श्रमकरी ग्रुपच्या वतीने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेल्या अनेक दिवसांपासुन बँकेत पासबुक प्रिंट व नवे पासबुक देणे ही सुविधा विस्कळीत झाली आहे. आधार व पॅनकार्ड लिंक करूनही पुन्हा नव्याने करा असे सांगतात. ग्राहकांना रांगेत तासनतास उभे राहूनही स्वता:चेच पैसे काढण्यासाठी तिष्ठत बसावे लागत आहे. सध्या तीव्र दुष्काळाची परिस्थिती असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी,शेतमजुर हा बँकींग कामासाठी बँकेत आला असता त्याचा सुंपर्ण दिवस वाया जातो व बँकेचे कामही होत नाही. आपुर्या सुविधा,अपुरे मनुष्यबळ यातून ग्राहकांची प्रचंड हेळसांड होत आहे. यामुळे बँकेने स्वतंत्र टेबल व्यवस्था निर्माण करून शेतकरी व शेतमजुरांना सुविधा द्यावी,आधार व पॅनकार्ड लिंक ही सुविधा तत्पर व सुरळीत करावी, पासबुक प्रिंट देणारे यंत्र (मशिन) सातत्याने बंद असते ते तात्काळ दुरूस्त करावे किंवा नवे अत्याधुनिक मशिन बसवावे,बँकेच्या कर्मचा-यांनी बँकींगचे दिलेले काम वेळेत करावे,बँकेची मंद व संथ गतीची बँकींग सेवा गतीमान करावी,बँकेने ग्राहकांना नविन खाते उघडण्याची सुविधा पुन्हा सुरू करावी.या सहीत विविध बाबींचा समावेश सदरील निवेदनात आहे. निवेदनावर देवळा श्रमकरी ग्रुपचे सदस्य रविंद्र देवरवाडे,अशोक खामकर,रामचंद्र सगट, भाऊसाहेब खामकर, बालासाहेब खामकर, भगवान गुळभिले, गोपीचंद देशमुख, यशवंत माणिक आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
एस.बी.आयने बँकींग सेवेत सुधारणा करावी
एस.बी.आय.बँकेत शेतकरी,महिला,पुरूष, विद्यार्थी,शेतमजुर आणि नौकरदार हा ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने जोडला गेला असल्याने या सर्वांचा ताण बँकेच्या दैनंदिन व्यवस्थापनावर पडत आहे.त्याचा परिणाम असा की, ग्राहकांना सुरळीत बँकींग सेवा मिळत नाही.कधीही बँकेत जा ग्राहकांच्या लांबच लांब रांगा असतात.याचा नाहक त्रास हा विशेषता: ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुर,महीला,ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. त्यामुळे बँकेने तात्काळ बँकींग सेवेत सुधारणा करावी.यासाठी निवेदन दिले आहे.
–रविंद्र देवरवाडे,(सदस्य,देवळा श्रमकरी ग्रुप.)