सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सुनील राकडे(गोंदेगाव)यांची पतसंस्थेच्या जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.त्यामुळे त्यांचा तालुका संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हापतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनील राकडे यांची बिनविरोध निवड होताच सोयगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने बैठकीतच जल्लोष करण्यात आला यावेळी तालुका सचिव सुनील मंगरुळे,महेंद्र निकम,नितीन पाटील,श्रीकांत पाटील,राजेश ढेपे आदींनी त्यांचा सत्कार केला व मराठा प्रतिष्ठान तर्फे राकडे नानासाहेब ना शुभेच्छा देण्यात आल्या.