सोयगाव,दि.१८:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― रेल्वेस्थानकावर निरक्षर अथवा नवीन व्यक्ती रेल्वेची चौकशी करतांना आपण बरयाचवेळा पहिले असेल परंतु रविवारी पहाटे मध्य रेल्वेच्या चाळीसगाव स्थानकावर चक्क दिसायला भटके व मोकाट कुत्रे मात्र स्थानकात चौकशी कक्ष आणि प्रवाशांच्या अवतीभोवती आढळून आल्याने प्रवाशांचा संभ्रम झाला होता या कुत्र्या कडून मात्र प्रवाशांना कोणताही त्रास न देता चक्क गाडीच्या चौकशीचा आभास या कुत्र्यांनी निर्माण केला होता यावेळी मात्र चाळीसगाव स्थानकावर नाशिक कडे जाणारी झेलम आणि जळगाव कडे जाणाऱ्या गोंदिया एक्स्प्रेसच्या वेळा झाल्या होत्या त्यामुळं चाळीसगाव स्थानक गर्दीने खचाखच भरून गेले होते दरम्यान या कुत्र्यांची प्रवाशांनी थेट रेल्वेप्रशासनाकडे माहिती दिल्यावर संबंधित प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांना हुसकविल्या नंतरही या कुत्र्यांनी पुन्हा स्थानाकचा ताबा घेतला मात्र दोन्ही गाड्या स्थानकावर येईपर्यंत कुत्र्यांनी प्रवाशांना त्रास न देता थांबून राहिले होते,त्यामुळे या कुत्र्यांचे रहस्य मात्र कळाले नव्हते.
दरम्यान हि भटके दिसणारी व मोकाट असलेल्या कुत्र्याच्या चमूकडून मात्र केवळ प्रवाशांचे सामान सुंगन्याचा प्रकार सुरु होता. त्यामुळे हि भटके दिसणारी कुत्री पोलिसांचे काम तर करत नसावी असा संशय प्रवाशांनी व्यक्त केल्या जात होता अखेरीस पर्यंत या कुत्र्यांच्या अजब कहाणी बाबत उलगडा झाला नसल्यानं मात्र स्थानाकावर संभ्रम निर्माण झाला होता.
स्थानाकवर हि मानसाललेल्या कुत्र्यांच्या चमूकडून प्रवाशांना कोणतीही इजा झालेली नव्हती परन्तु हि कुत्री स्थानाकावर का आली हा प्रश्न मात्र अनित्तरीत राहिला असून यामुळे स्थानकाचे सुरक्षा मात्र असुरक्षित झाली असल्याची बोलकी प्रतिक्रिया मात्र प्रवाशी व्यक्त करत होते मात्र मुकाट्यानं प्रवाशांचा मार सहन करत उभ्या असलेल्या कुत्र्यांनी भुंकण्याचा आवाज न करता दोन्ही गाडया रवाना झाल्यावर स्थानकातून काढता पाय घेतला.
