पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―सातगाव डोंगरी परिसरात अतिवृष्टी झाल्याने, पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तोंडी घास आलेल्या उभ्या कपाशीचे पीक वाहून गेल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे.
अगोदरच मेटाकुटीला आलेल्या शेतकर्यांचे अतिवृष्टीने पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, खानदेशातील पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचे कपाशीची उभे पिकच मुळासह वाहून गेल्याने, शेतकऱ्यावर पुन्हा आर्थिक संकट कोसळण्याचे चित्र निर्माण झाले आहे. “आई जेऊ देईना, बाप भीक मागू देईना “. परतीच्या पावसाने संकट निर्माण झाल्याने, शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या घटनेला दोन दिवस उलटून झाले तरीही प्रशासनाला जणूकाही कुंभकर्णाची झोप लागली की काय ? असे शेतकऱ्यांच्या तोंडून बोलले जात आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी. अशी आर्त हाक बळीराजाने प्रशासनाला केली आहे.