बीड नगरपरिषद: गोपीनाथ मुंडे यांचे निष्ठावंत पप्पू कागदे यांना उमेदवारी नाकारल्याने समर्थक आक्रमक; सोशल मीडियावर नाराजीचा सूर

बीड नगरपरिषदेच्या रणधुमाळीत दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय पप्पू कागदे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आंबेडकरी चळवळीला आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याची भावना व्यक्त होत असून, समाजमाध्यमांवर समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.