बीड जिल्हाविशेष बातमी

बीड: खा.प्रितमताईंनी दिल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला रस्ता दुरुस्तीच्या सूचना

खा. प्रितमताई दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार - सलीम जहाँगीर

बीड:आठवडा विशेष टीम―गेवराई - बीड आणि चौसाळा येथे बायपास रस्ते झाले आहेत. मात्र तिन्ही शहरातुन जाणारे रस्ते अतिशय खराब झाले आहेत. त्या सर्व रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्याच्या सूचना खा. प्रितमताई मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. गाडेकर यांना दिल्या आहेत. या तिन्ही ठिकाणच्या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात खा. प्रितमताई लवकरच दिल्लीत केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणारा असल्याचे भाजप नेते तथा जिखा विकास सनियंत्रण समिती ( दिशा ) चे सदस्य सलीम जहाँगीर यांनी सांगितले.

बीड शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर बार्शी रोडकडील सोमेश्वर मंदिराच्या समोरपासून ते अमन लॉन्स पर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. महामार्गावर इतर ठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. यासंदर्भात जिल्हा विकास सनियंत्रण समितीचे सदस्य सलीम जहाँगीर यांनी खा. प्रितमताई मुंडे यांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत खा. प्रितमताई मुंडे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता गाडेकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली. शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा. तात्पुरती दुरुस्ती करून नागरिकांना होणारा त्रास दूर करा अशा सूचना त्यांनी गाडेकर यांना दिल्या. कायमस्वरूपी दुरुस्ती किंवा रस्ता पुनर्बांधणी संदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेवून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन खा.प्रितमताई यांनी दिले. खा. प्रितमताई मुंडे यांनी स्वतः रस्त्याच्या प्रश्नात लक्ष घातल्याने दोन दिवसात शहरातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याचे सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे. भाजपचे सर्व पदाधिकारी यासाठी प्रयत्नशील असून काम करून घेणार असल्याचे सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हा परिषद सभापती संतोष हांगे , सुभाष धस,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गलधर, विक्रांत हजारी, राजेंद्र बांगर , अजय सवाई , प्रवीण पवार,संदीप उबाळे , दिविदास नागरगोजे,मुसा खान, शेख इर्शादभाई, सुनील मिसाळ , संतोष राख, अनिल चांदणे , दत्ता परळकर, कपिल सौदा , अमोल वडतिले, हरीश खाडे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.