अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमीसामाजिक

माणसामुळेच बदलतेय निसर्गचक्र―प्रा.विजय दिवाण

लोकनायक जयप्रकाश नारायण जयंतीनिमित्त व्याख्यान

अंबाजोगाई: आठवडा विशेष टीम―
येथील जयप्रभा ग्रामिण विकास मंडळ व ज्येष्ठ नागरिक संघ, अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनायक जयप्रकाश नारायण जयंतीनिमित्त अंबाजोगाईत पाणी व पर्यावरण विषयाचे अभ्यासक प्रा.विजय दिवाण (औरंगाबाद) यांच्या व्याख्यानाचे आयोजन शनिवार, दि.30 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.गेल्या 17 वर्षांपासुन जयप्रभा ग्रामिण विकास मंडळ पाटोदा (म.) हा उपक्रम राबवते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    कुणबी विकास मंच सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिकराव पवार तर प्रमुख पाहुणे म्हणुन बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजकिशोर मोदी,जयप्रभा ग्रामिण विकास मंडळाचे अध्यक्ष मनोहर काकडे,सचिव शिवाजीराव खोगरे,विलासराव सोनवणे, डॉ.दामोधर थोरात,अ‍ॅड. अनंतराव जगतकर,डॉ.शाम दंडे (औरंगाबाद) यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रा.विजय दिवाण यांनी ‘निसर्ग का बदलला‘ या विषयावर आपले मौलिक विचार मांडले.मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीच्या पर्यावरणात दिवसें दिवस बदल होत आहे.तापमान वाढून पृथ्वीचे वातावरण हे तप्त होत आहे.त्यामुळे वातावरणात अनेक वायुंचे उ:त्सर्जन होते. भारत,चीन,युरोप,रशिया, अमेरिका या देशातील वाढते नागरिकीकरण,कारखानदारी यामुळे नैसर्गिक संपदा यांची हानी होते.पाणी,हवा,जमीन प्रदुषीत होवून जंगले संपत चालली आहेत.भारतात स्मार्ट सिटी सारख्या प्रकल्पांमुळे नैसर्गिक जंगल संपदा नष्ट होवून सिमेंटचे जंगल वाढत आहे. त्यामुळे बिन गरजेच्या वस्तुंचे उत्पादन पुढील काळात थांबवावे लागेल.पर्यावरण रक्षण होईल.हानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. ऊर्जेसाठी सुर्यप्रकाशाला प्राधान्य द्यावे लागेल.नैसर्गिक पद्धतीने जीवन कसे जगता येईल याचा विचार होणे गरजेचे आहे.अन्यथा पुढील काही दिवसांत मुंबई,पश्‍चिम-बंगाल, अंदमान निकोबार व पाँडेचरी सारखे प्रदेश पाण्यात बुडण्याचा धोका आहे.असा इशारा प्रा. विजय दिवाण यांनी आपल्या व्याख्यानात स्लाईड-शोद्वारे अनेक बाबींचा उलगडा करून दिला.यावेळी उपस्थित श्रोत्यांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना प्रा.दिवाण यांनी सकारात्मक उत्तरे दिली.प्रारंभी जयप्रभा विद्यालयातील मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले.तर ज्येष्ठ नागरिक संघाचे श्रीरंग सुरवसे व श्रीधर काळेगावकर यांनी पर्यावरणावर आधारीत गीत सादर केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.मनोहर कदम यांनी करून उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक बन्सी पवार यांनी मानले.या कार्यक्रमास 175 हुन अधिक ज्येष्ठ नागरिक स्ञी- पुरूष,जयप्रभा ग्रामिण विकास मंडळाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे धनराज मोरे,पद्माकर सेलमोकर,दत्ता आवाड,रजनी काळदाते,आशा वाघमारे,श्रीरंग चौधरी,नारायण केंद्रे,भगवानदास भन्साळी, शिवाजी शिंदे,बालाजी मुंडे, जनार्धन मुंडे,कॉ.काशिनाथ कापसे,कोंडीबा राऊत,मारूती रेड्डी, गावस्कर , गिरगीरवार , प्रा.हुंबाड,झंवर काका,संभाजी रेड्डी यांच्यासह जयप्रभा ग्रामिण विकास मंडळाचे पदाधिकारी व शाळेच्या शिक्षकांनी पुढाकार घेतला.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.