अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युजविशेष बातमी

धनराज मोरे यांना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघाचा आदर्श पिता पुरस्कार जाहिर

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ नागरिक संघाचे कोषाध्यक्ष धनराज रामकृष्ण मोरे यांना महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघ,मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श पिता पुरस्कार जाहिर झाला आहे.15 डिसेंबर रोजी सदरील पुरस्काराचे वितरण नांदेड येथे होणार्‍या राज्य अधिवेशनात करण्यात येणार आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    धनराज रामकृष्ण मोरे यांचे वय 83 वर्षे आहे.ते ज्येष्ठ नागरिक संघाचे पुर्णवेळ कार्यकर्ते आहेत. ज्येष्ठ नागरिक संघाच्या दैनंदिन कामकाजाचा हिशोब ठेवणे, निवडणूक प्रक्रिया आदींमध्ये तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित विविध सामाजिक उपक्रम राबविणे या सोबतच अधिवेशनाच्या निमित्ताने घेण्यात येणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग हा उत्साहवर्धक राहिलेला आहे.धनराज मोरे हे माजी सहकार अधिकारी आहेत.
    सर्वजण त्यांना 'मोरे बापु' या नावाने ओळखतात. त्यांना संजय मोरे व राजु मोरे हे दोन मुले व सौ.सुरेखा मुळे ही एक कन्या आहे.आपल्या मुलांना प्रोत्साहन देवून शैक्षणिक,सहकार व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनिय कार्य केले आहे. राजर्षी शाहु पतसंस्था,राजर्षी शाहु शैक्षणिक संकुल यांचे निर्मिती करून समाजासमोर उद्योजक परिवार अशी मोरे परिवाराची ओळख आहे.एकत्र कुटुंब पद्धतीचा आदर्श धनराज मोरे यांनी समाजासमोर ठेवला आहे.काही दिवसांपुर्वी त्यांनी आर्यवीर मंगल कार्यालयाची उभारणी केलेली आहे.त्यांच्या या सर्वांगिण बाबींचा,कार्याचा विचार करून राज्य ज्येष्ठ नागरिक संघ,मुंबई यांनी त्यांना यावर्षीचा 'आदर्श पिता पुरस्कार' जाहिर केला आहे.सदरील पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल धनराजबापु मोरे यांचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पुंडलिक पवार,सचिव प्रा. मनोहर कदम,कार्याध्यक्ष अ‍ॅड. अनंतराव जगतकर,सहसचिव पद्माकर शेलमोकर,माजी अध्यक्ष डॉ.डी.एच.थोरात,ज्येष्ठ महिला नागरिक संघाच्या अध्यक्षा कमलताई बरूरे आदींसहीत इतरांनी त्यांचे स्वागत केले आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.