परळी तालुकाबीड जिल्हाब्रेकिंग न्युज

परळीतील तीन पोलीस ठाणे अंतर्गत सुरु असलेले अवैध धंदे तत्काळ बंद करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

काँग्रेस नेते वसंतराव मुंडे यांची मागणी

परळी:आठवडा विशेष टीम―अंबाजोगाई विभागात असलेल्या परळी तालुक्यातील तीन पोलीस स्टेशन च्या हद्दीत गुन्हेगारी व अवैध धंद्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे या धंद्यामुळे तरूण पिढी व्यसनाधीन होत आहे तरी यावर आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनी व पोलीस आधिक्षक बीड यानी वैयक्तिक लक्ष घालून गुन्हेगारी रोखण्यासाठी अवैध धंदे बंद करुण दोषी आधिकार्यांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केली आहे
परळी पोलीसाच्या अर्थपुर्ण दुर्लक्षामुळे कल्याण नावाचा मटका, गुटखा ,दारू विक्री जोरात चालू असून, गावठी दारुची विक्रीही सर्रास चालू असल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्याच्या समोरच ऑनलाईन मटक्याची दुकाने चालू आहेत हे विशेष.परळी शहर व संभाजीनगर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोरात सुरू आहेत. या अवैध धंद्यांना राजकीय व स्थानिक पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे.
शहरातील परळी शहर व संभाजीनगर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे जोरात सुरू आहेत, मात्र परळी पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने या परिसरात खुलेआम अवैध धंदे केले जात आहेत. दारू, गांजा, मटका, जुगार असे अनेक अवैध धंदे समंधित बिट अंमलदारांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. शहरात जवळपास तीन ते चार मटका बुकीचालक आहेत. त्यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. दोन-तीन वर्षापूर्वी मटका व्यवसाय काहीसा कमी झाला होता, मात्र तो पुन्हा जोमाने सुरू झाला आहे. गल्लीबोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, पत्त्याचे क्लब हॉटेल व ढाब्यावर मिळणारी दारू यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच शहरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकारांकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. तसेच शहरात गुन्हेगारी घटना घडत आहेत.मात्र याला आळा बसणे गरजेचे असल्याने परळी परिसरातील नागरिक पोलिस अधीक्षकांना भेटणार असल्याची माहिती नागरिकांनी निवेदनातून दिली आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे परळीची बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असतानाही दुसरीकडे मटक्याचा बाजार मात्र बहरत आहे़ उन्हाळा असो की, पावसाळा हा व्यवसाय राजरोसपणे वाढतच चालला असून, लाखो रुपयांची उलाढाल या मटक्यातून हात आहे़ पोलिस प्रशासन मात्र मटका व्यवसायाला लगाम घालण्यात अपयशी ठरल्याचेच दिसत आहे़ परळीमध्ये मागील अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू आहे़ पोलिस प्रशासन छोट्या मोठ्या कारवाया करते़ परंतु, अवैधरित्या सुरू असलेला हा मटका पूर्णत: बंद करण्यासाठी मात्र ठोस पावले उचलली जात नाहीत़ आमचे प्रतिनिधी शहरात ठिक ठिकाणी फिरून मटका व्यवसायाची माहिती घेतली असता शहरातील सर्वच गल्लीबोळांमध्ये मटक्याचा हा बाजार थाटल्याचे पहावयास मिळाले़ गव्हाणे चौकातून मटका बुकींचा शोध घेतला असता नवा मोंढा भागात मटका अड्डे सुरू असल्याचे पहावयास मिळाले़ पार्टीशनच्या टपरीमध्ये एका आडोशाला हा व्यवसाय सुरू असतो़ तासा-अर्ध्या तासाला चोरट्या पावलांनी एक-एक व्यक्ती येथे येत होता आणि मटका लावून जात असल्याचे पहावयास मिळाले़ याच भागात इठलापूर मोहल्ल्यातही एक मटका अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आले़ येथून पुढे गंगाखेड रोड, बसस्थानक ते रेल्वेस्थानक या भागात ते टपऱ्यांवर मटका घेतला जात असल्याचे निदर्शनास आले़ मोंढा भाग, टावर, सुभाष चौक, शिवाजी चौक,रेल्वे स्टेशन, नेहरू चौक, गणेशपार अशा प्रत्येक दिशेला कोपऱ्या कोपऱ्यामध्ये मटक्याचा व्यवसाय सुरू असल्याचे पहावयास मिळाले़ परळी शहरातच जागोजागी मटक्याचा व्यवसाय चालतो़ या मटक्याचे जाळे किती मोठ्या प्रमाणात पसरले असावे, याचा अंदाज येतो़ रोजंदारीवर काम करून संसाराचा उदरनिर्वाह करणारे अनेक जण दररोज एकदा तरी मटक्याचा आकडा लावत असल्याचे सांगण्यात आले़ झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी मटका मात्र वाढत चालला आहे़ शहरात परळी शहर, संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कल्याण नावाचा मटका व्यवसाय तेजीत असल्याचे निदर्शनास येते़ पोलिस प्रशासनाच्या नावापुरत्या कारवाया करतात या मटका व्यावसायाला बळ देत आहेत़ मोठ्या बुक्कींवर पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे हा व्यवसाय जोमात सुरु आसणारे अवैध धंदे बंद करण्यात यावेत यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्रह मंत्री एकनाथ शिंदे यांना हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे भेटून कारवाईसाठी निवेदन सादर करणार अशी माहिती पत्रकारांना काँग्रेसचे नेते वसंतराव मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी केला आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.