मोदी शहा सरकार विरोधात प्रचंड घोषणा बाजीने तहसील परिसर दणाणला
पाटोदा:गणेश शेवाळे― केंद्र सरकारच्या वतीने भारताच्या सविधान विरोधी कायदे करुन हुकूमशाही पध्दतीने लोकशाहीचा घात करुन भारतीय सविधानाच्या कायदयांची पायमल्ली करुन देशामध्ये असंहषनुतेचे वातावरण निर्माण करुन सविधानाला संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे त्यांनी केलेले एन.आर.सी . व कॅब कायदे रद्द करावे भारत हा देश धर्म निरपेक्ष असुन धर्माच्या नावाने नागरीकत्व संशोधन विधयक हे केंद्र सरकारने संसदेमध्ये पारीत केलेले असुन या विधेयकामध्ये अल्पसंख्याक समाज भयभीत झाला असुन एकाच समाजासाठी हे नागरीकत्व न देण्याच्या विधेयकामुळे एकाच समाजास लक्ष केंद्रीत करुन सदर विधेयक पारीत झालेले आहे तरी हे विधेयक केंद्र सरकारने तात्काळ रद्द करुन सर्वासाठी एकच कायदा आसावा वेगवेगळे कायदे करु नये व भारतीय राज्य घटनेचे धर्म निरपेक्ष मुल्य जोपासावेत यासाठी नागरिकत्व दुरुस्ती विधेयका विरोधात देशभरात उडालेलया भडक्यानंतर आता महाराष्ट्र राज्यांमध्येही असंतोष उफाळून येत असुन मंगळवार दि 17 /12 /2019 रोजी पाटोदा तहसील समोर धरणे आंदोलन करुन या विधयकास विरोध दर्शविण्यात आला यावेळी विविध मान्यवराने आपले मनोगत वेक्त करून सरकारचा निषेध केला यावेळी मोदी शहा सरकार विरोधात प्रचंड घोषणा बाजीने तहसील परिसर दणाणले यावेळी पाटोदा तालुक्यातील हिंदू मुस्लिम बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.