औरंगाबाद जिल्हाब्रेकिंग न्युजसोयगाव तालुका

सोयगाव: फर्दापूर-चाळीसगाव राज्यमार्गावरील लुटमार प्रकरणाचा छडा ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले आरोपी जेरबंद

सोयगाव,दि.२२:आठवडा विशेष टीम―
फर्दापूर-चाळीसगाव राज्यमार्गावरील बनोटी-वरठाण आणि फर्दापूर-सोयगाव या रस्त्यादरम्यान एकाच दिवशी झालेल्या रस्तालुटीतील प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावून शनिवारी रात्री या प्रकरणातील सिल्लोड तालुक्यातील पाच पैकी तीन आरोपींना अटक केले आहे.यातील एक आरोपी दर्यापूर ता.अकोट पोलिसांनी अटक केलेला असल्याने रविवारी या पाच पैकी अटकेत असलेल्या तीन आरोपींना सोयगावच्या न्यायालयात हजर केले असता,तिघांची(दि.२४)पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने रविवारी दिले आहे.
सोयगाव तालुक्यातून जाणाऱ्या एकमेव फर्दापूर-चाळीसगाव राज्यमार्ग क्र-२३ वरील बनोटी-वरठाण आणि फर्दापूर-सोयगाव या रस्त्यादरम्यान बुधवारी(दि.११)रात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी दरोडेखोरांनी धाडसी रस्तालूट करून दोन्ही घटनेत ५१ हजाराचा मुद्देमाल लांबविला होता.या प्रकरणी बनोटी-वरठाण रस्त्यावरील रस्तालुटीत देवळांना(ता.कन्नड)येथील बियाण्यांचा व्यापारी विष्णू फाळके हा तिडका गावाकडून बनोटीकडे जात असतांना वरठाण जवळील हिवरा नदीच्या पात्रावर चारचाकी वाहन क्र-एम,एच-२० ई-जि-१९१८ अडवून रस्ता लुट करून दहा हजार रु आणि फर्दापूर-सोयगाव रस्त्यावर जंगलातांडा शिवारातील वरखेडी(खु) येथील मोटारसायकलस्वर मनोज ठाकूर याचेकडून ४१ हजार रु मुद्देमाल लुटला होता.या दोन्ही प्रकरणी सोयगाव आणि फर्दापूर पोलीस ठाण्यात रस्तालुटीचा गुन्हा दाखल झाल्यावर स्र्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोयगाव,फर्दापूर घटनास्थळी भेटी देवून तपासचक्रे सुरु केले.यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात दोन्ही गुन्हे एकाच टोळक्यांनी केल्याचे निष्पन्न होताच तपास चक्रे गतिमान फिरविण्यात आली.या तपासात तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून हि रस्ता लुट प्रकरणात जितेंद्र मन्साराम चव्हाण(वय २५ रा.उमरा ता.अकोट जि.अकोला सध्या वास्तव्यास मांडणा ता.सिल्लोड),अक्षय श्रीराम लबडे(वय २४)विकास दारासिंग जाधव(वय १९ रा.मांडणा ता.सिल्लोड)दीपक शेषराव पवार(वय १९)मंगेश ज्योतीराव बावणे(वय २६,रा.मुंडगाव ता.अकोट)या पाच जणांना चौकशीवरून अटक करण्यात आली आहे.यामधील जितेंद्र चव्हाण व अक्षय लबडे यांच्या विरुद्ध यापूर्वी अकोला,अमरावती,आदिलाबाद या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाल्यावरून हा धागा पकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी या आरोपींना शिताफीने अटक करून सोयगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले.त्यांचेकडून वरठाण व जंगलातांडा दरोड्यातील गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकल क्र-एम,एच-२०,सी.बी-५६०१ सात मोबाईल,चाकू आणि काही शस्रे असा ६३५०० रु मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे,सोयगावचे पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे,उपनिरीक्षक भगतसिंग दुलत,सहायक फौजदार सुधाकर दौड,सैयद झिया,नामदेव शिरसाठ,राजेंद्र जोशी,योगेश तरंमाळे,ज्ञानेश्वर मेटे,संजय तांदळे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

मिरचीतोड मजुरांमध्ये आरोपी लपून-

या रस्तालुट प्रकरणातील अटक करण्यात आलेले पाचही आरोपी परजिल्ह्यातील आलेल्या सिल्लोड तालुक्यातील मिरची तोड मजुरांमध्ये हे आरोपी लपून बसले असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून या पाचही आरोपींना ताब्यात घेतले होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.