औरंगाबाद:आठवडा विशेष टीम― सोलापूर विद्यापीठ स्थापन झाल्यापासून या विद्यापीठाच्या नावासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात यावे यासाठी समस्त धनगर समाजच्या सामाजिक तथा राजकीय व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचाराने महाराष्ट्र मध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक आणि राजकीय संघटना तसेच राजकीय पक्ष च्या वतीने मागील 10 वर्ष पासून सोलापूर विध्यापिठच्या नामविस्तारासाठी कार्यकेल्या नंतर मागील सरकारने सोलापूर विद्यापीठ चे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर असे नामविस्तार केलेला आहे.
तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य सोलापूर विद्यापीठातील विध्यार्थी तथा विध्यार्थीनी,प्राध्यापक वर्ग,आणि महाराष्ट्रतील सामाजीक कार्य करणाऱ्या जन सामन्यातील सामान्य नागरिकांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यची ओळख सर्वपर्यंत पोहचण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ परिसरामध्ये अश्वरूढ पुतळा उभारून त्यांच्या कार्याची ओळख सर्वपर्यंत पोहचविण्याचे प्रेरणादायी कार्य आपल्या मार्फत व्हावे आणि भारतामध्ये स्वतंत्र पूर्वी निसंकोच 29 वर्ष इंदोर राज घराण्याची राजसत्ता धर्म निरपेक्ष चालवणाऱ्या देशातील अगण्य महिला शक्तीच्या कार्याचा देशाला व मानव जातीला माहिती होण्यासाठी धनगर समाज क्रांती मोर्चा वतीने नम्र विनंती करण्यात येते
या वेळी धनगर समाज क्रांती मोर्चा संस्थापक डॉ. संदीप घुगरे, युवा संघटक शिवाजी नेमाने, दलित साहित्यिक विचारवंत सिद्धार्थ दाभाडे, मीरा जानराव, एकनाथ खटके,गणेश तोतरे, विक्रम वाघमोडे, संकेत हजारे, कैलास गायके, नानासाहेब जानराव,समता परिषदे चे प्रसिद्ध प्रमुख संदीप घोडके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.