ब्रेकिंग न्युजमहाराष्ट्र राज्यराजकारणविशेष बातमीशेतीविषयक

कुठल्याही अटी शर्तीशिवाय सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा सरकारने शब्द पाळावा―डॉ.अजित नवले

आठवडा विशेष टीम―महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी आम्हाला मान्य नाही. त्यामध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी केली आहे.किसान सभेच्या वतीने दि.16 रोजी शेतकरी कर्जमुक्ति मेळावा सिरसाळा ता परळी येथे आयोजित केला होता या वेळी व्यापीठावर कॉम्रेड विठ्ठल मोरे,शेतकरी नेते कॉ दत्ता डाके अँड अजय बुरांडे कॉ मुरलीधर नागरगोजे गंगाधर पोठभरे,सुदाम शिंदे,काशीराम शिरसाठ पी एस घाडगे इत्यादी उपस्थित यावेळी किसान सभेचे डॉ अजित नवले यांनी बीड जिल्ह्यातील खरीप 2018 चा पीक वीमा शेतकऱ्यांना मिळवून दिल्या बद्दल किसान सभा बीड जिल्हा उपाध्यक्ष कॉ अजय बुरांडे यांचे अभिनंदन केले. पुढें बोलताना नवले म्हणाले मराठवाडयात मागील पाच वर्षांपासून दुष्काळी स्थिती होती. त्यामुळे शेतकरी आत्महत्या अधिक आहेत. शेतकऱ्यांच्या सातबारा वरील सर्व कर्ज माफ करावे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेतमालाला दीडपट हमी भाव देण्यात यावा. शेतकऱ्यांना चिंता मुक्त करण्यासाठी सर्वंकष पीक वीमा धोरण राबवावे.यासाठी पक्षभेद विसरून सर्व शेतकऱ्यांनी एकजूट होण्याचे आहवान या प्रसंगी त्यांनी केले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकजुटीतून 75℅ शेतकऱ्यांचा पीकविमा प्रश्न सुटका असला तरी शेवटच्या शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे त्याच्या खात्यात जमा होईपर्यंत संघर्ष सूरुच राहणार असल्याचे अजय बुरांडे यांनी सांगितले. दुष्काळी अनुदान, प्रधानमंत्री किसान सन्मान मदत,पीकविमा व इतर प्रलंबित शेतकऱ्यांच्या पश्नावर दि.10फेब्रुवारी2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे देण्याचे ठरवण्यात आले. या प्रसंगी काँ. विठ्ठल मोरे, काँ. पी.एस.घाडगे,यांनी शेतकऱ्यांना संघटित होण्यासाठी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास जिल्ह्यातील विविध गावातून मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती दाखवली. अनेक गावातील शेतकऱ्यांनी पीकवीमा अंदोलन यशस्वी केल्या बद्दल अजय बुरांडे यांचा सत्कार करुन अखिल भारतीय किसान सभेचे आभार मानले.