औरंगाबाद जिल्हासोयगाव तालुका

सोयगाव-शेंदुर्णी रस्त्यासाठी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण, शहरवासीयांचा इशारा


सोयगाव,ता.२२:आठवडा विशेष टीम―
सोयगाव-शेंदुर्णी रस्त्याच्या एकमेव मराठवाडा आणि खानदेशला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून दुरुस्तीच्या चौथ्या महिन्यात हा रस्ता खड्डेमय झाला आहे.याबाबत शहरवासीयांनी एक दिवसीय निदर्शने करूनही सार्वजनिक विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप करत प्रजासत्ताक दिनी सोयगाव बंदचे आवाहन करून रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.बुधवारी नागरिकांनी तहसीलदार प्रवीण पांडे यांना निवेदन दिले आहे.
मराठवाडा आणि खानदेशला जोडणारा एकमेव सोयगाव-शेंदुर्णी रस्ता डागडुजीच्या चारच महिन्यात पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डा यामुळे या रस्त्यावरून अपघातांचे प्रमाण वाढले आहे.दुचाकी चालकांना या रस्त्यावरून प्रवास करतांना जीव मुठीत घ्यावा लागत आहे.त्यामुळे संबंधित विभागाच्या विरुद्ध प्रजासत्ताक दिनी रस्ता रोको करून एक दिवस शहर बंदचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर मंगेश सोहनी,मनोज विसपुते,अमोल श्रीवास्तव,महेश राउत,राजू दुतोंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.