अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाविशेष बातमी

अन्याय अत्याचाराला आळा घाला― युवा आंदोलनचा निषेध मोर्चा ; मुख्यमंत्र्यांना निवेदन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― राज्यातील वाढत्या अन्याय अत्याचाराला आळा घालून दोषींवर कडक कार्यवाही करावी.या मागणीचे निवेदन युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपजिल्हाधिकारी यांना मंगळवार दि.28 जानेवारी रोजी दिले.यावेळी युवा आंदोलनच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.

युवा आंदोलनाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्रात रोज अन्याय,अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ होत आहे.सर्वसामान्य माणसाचा कायद्यावरचा विश्‍वास उडत चालला आहे. कायद्याचे रक्षकच भक्षकासारखे वागत आहेत. आपली महाराष्ट्र भूमी हि संतांची,महापुरूषांची परंपरा लाभली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रांत महिला, मुली सुरक्षित नाहीत. त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.मागील कांही घटनावरून आपल्या लक्षात येईल.कायदा हा सर्वांसाठी आहे, हे तुम्हाला पिडीतांना न्याय देवून दाखवून धवे लागेल. आपण पुरोगामी म्हणून वारसा सांगणारे पण एखाद्या घटनेमध्ये ती पिडीत कोणत्या जातीची आहे,याच्यावर महाराष्ट्रातील पुरोगामी जनता रस्त्यावर येते हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही.दिनांक 14 डिसेंबर 2019 रोजी अकोला जिल्ह्यातील मरोडा गावातील मनिषाताई सरकटे हिच्यावर अत्याचार करून तिचा खुन केला व गुन्हा लपविण्यासाठी घरासमोरील आडुला लटकवून दिले.दुसरी घटना अंबाजोगाई मधील 8 वी वर्गात शिकणारी मुलगी तिच्यावर शाळेतील क्रीडा शिक्षकाने अत्याचार केला. तिसरी घटना साईबाबा माध्यमिक विद्यालय मध्ये शिकणार्‍या 7 वी तील मुलीवर शाळेतील शिक्षकांनी सामुहिक अत्याचार केला सध्याती मुलगी कोमामध्ये आहे.रोज महाराष्ट्रात अशा घटना घडत आहेत. ज्या शिक्षकांवर भविष्य घडविण्याची जिम्मेदारी आहे, तेच असं करत असल्यामुळे मुलींना शाळेत पाठवावे का नाही? हा प्रश्‍न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे.अशा घटनाला आळा बसविण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी लागणार आहे.ज्या शिक्षकांनी हे कृत्य केले आहे, त्यांना माफी मिळू नये.त्यांना आपल्या या कृत्याची जाणीव व्हावी म्हणून त्यांना फाशी देण्यात यावी. बाललैंगिक अत्याचार कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करावी.ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये हा प्रकार घडला आहे.त्या संस्थेच्या संचालक मंडळाला सहआरोपी करावे. सर्व शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवावे,जे पोलीस कर्मचारी यांनी आरोपीला सहाय्य करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे,त्यांच्यावर सहआरोपी करून गुन्हा दाखल करावा.सदरील मागण्या संदर्भात गांभीर्याने दखल घेवून आरोपींना कडक शासन करावे. सदरील सर्व खटले हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावेत जर आपण आरोपीस शिक्षा करण्यास टाळाटाळ कराल तर युवा आंदोलन संघटनेच्या वतीने महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. त्यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर युवा आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष अशोक पालके,अक्षय भुंबे,सत्यभागा सौंदरमल, धिम्ंमत राष्ट्रपाल,अक्षय शिंदे, शाहीर सर,दत्ता उपाडे,जालिंदर कसाब,दिलीप लोंढे,हणुमंत गायकवाड,शांताबाई काळुंके, दिलीप पालके,राम जोगदंड, बळीराम उपाडे,महादेव गव्हाणे, बाळु गायकवाड,माया सगट, निता पाडुळे,विनोद वैराजे,राजेंद्र गायकवाड,बापुसाहेब उदारे, सचिन उपाडे,लहुराव लोंढे,राम उदार,अमोल गायकवाड आदीं सहीत इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.